Jamun Fruit Rate : जांभळाचे दर किलोला चारशे पार

Jamun Market : सध्या एक किलो जांभळाचा दर ४०० रुपयांपुढे गेला आहे.
Jamun Fruit
Jamun FruitAgrowon

Panvel News : यंदा बाजारात जांभळे उशिराच दाखल झाली आहेत. जांभूळ आरोग्यदायी आणि हंगामी फळ असल्याने त्याची चव घेण्यासाठी खवय्ये आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु, सध्या एक किलो जांभळाचा दर ४०० रुपयांपुढे गेला आहे.

मधुमेहात जांभूळ गुणकारी असल्याने त्याला सोन्याचा भाव आला आहे. रानमेवा म्हणून भेटणाऱ्या जांभळाला फळांच्या पंगतीत वरचे स्थान प्राप्त झाले आहे. पनवेलमध्ये पूर्वी मोठ्याप्रमाणात जांभळाची झाडे होती; परंतु शहरीकरणामुळे या परिसरातील बेसुमार वृक्षतोड झाल्याने जांभळाच्याही झाडावर संक्रात आली.

Jamun Fruit
Jamun Production : जांभळाच्या उत्पादनात घट ; पण भाव मात्र चांगला

त्यामुळे रानमेव्याच्या रूपात भेटणारे जांभूळ विकत घेवून खावे लागत असल्याची खंत स्थानिक नागरिक जनार्दन पाटील यांनी बोलून दाखवली. उपलब्धतेनुसार दरवाढ असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जांभळात ब्लूबेरीच्या तुलनेत जास्त फायबर असते. ज्यामुळे मधुमेहींसाठी जांभळाचे सेवन हा उत्तम पर्याय ठरतो.

जीवनसत्त्वे आणि खनिजे

जांभूळ फळामध्ये व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. लोह हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि रक्त नैसर्गिकरीत्या शुद्ध करते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते. ब्लूबेरी हे व्हिटॅमिन के, मँगनीजचे समृद्ध स्त्रोत आहेत; परंतु त्यामध्ये व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात आहे. जांभळात असणारी संयुगे कोलेस्टेरॉल जमा होण्याचे प्रमाण कमी करते.

Jamun Fruit
Jamun Season : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभूळ हंगाम लांबणीवर
पूर्वी पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात जांभळाची झाडे होती. त्या वेळी मोफत आणि मुबलक जांभळे खायला भेटायची; परंतु सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे जांभूळ विकत घेऊन खावे लागत आहे. आता जांभळाला सोन्याचा भाव आला असून रानमेवा म्हणून मिळणारे जांभूळ सध्या दरवाढीमुळे दुर्लभ झाल्याची खंत आहे.
जनार्दन पाटील, ज्येष्ठ नागरिक, पनवेल
जांभळाचा गर आणि बी हे दोन्हीही वेगवेगळ्या आजारांसाठी उपयुक्त आहे. मधुमेह रुग्ण गर खाऊ शकतात. त्यामुळे साखर वाढत नाही. जांभूळ खाण्याचे प्रमाण वयस्कर लोकांमध्ये, महिलांमध्ये जास्त आहे. खाण्यापूर्वी जांभळाला स्वच्छ धुऊन खावे. लहान मुलांनाही ते खाऊ घालणे चांगले आहे.
पूजा जाधव, आहारतज्ज्ञ, पनवेल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com