Jamun Production : जांभळाच्या उत्पादनात घट ; पण भाव मात्र चांगला

Team Agrowon

तब्बल दीड महिना विलंबाने या वर्षीचा जांभूळ हंगाम सुरू झाला असला तरी उत्पादकांच्या पदरी घोर निराशाच आली आहे.

Jamun Production | Agrowon

१० टक्केदेखील उत्पादन आले नसल्यामुळे जांभूळ उत्पादक संकटात सापडले आहेत.

Jamun Production | Agrowon

एकीकडे उत्पादन कमी असताना दुसरीकडे जांभळाला प्रतिकिलो २५० रुपयांचा दर मिळत असल्याने उत्पादकांना किंचित दिलासा मिळत आहे.

Jamun Production | Agrowon

गेल्यावर्षी पहिल्या टप्प्यातील हंगाम १६ मार्चपासून सुरू झाला. त्यानंतर हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होता. परंतु यावर्षी ४ मे पासून हंगाम सुरू झाला. मात्र या हंगामाची सुरुवात जाभूळ उत्पादकांसाठी निराशाजनक राहिली आहे.

Jamun Production | Agrowon

दरवर्षीच्या तुलनेत दहा टक्केदेखील जांभूळ उत्पादन मिळत नसल्यामुळे उत्पादकांमध्ये नाराजी आहे.

Jamun Production | Agrowon

दरवर्षी प्रतिकिलो १०० रुपये दर असायचा परंतु यावर्षी प्रतिकिलो २५० रुपये दर जाभळाला मिळत आहे. चांगल्या दराचा उत्पादकांना दिलासा मिळत असला तरी उत्पादनात मोठी घट आहे.

Jamun Production | Agrowon

जांभूळ हंगाम सुरू होऊन १३ ते १४ दिवस झाले आहेत. परंतु अपेक्षित आवक झालेली नाही. त्यामुळे उत्पादकांबरोबरच जांभूळ व्यावसायिक देखील मेटाकुटीला आले आहेत.

Jamun Production | Agrowon