
Climate Change And Agriculture : हवामान बदलाचा परिणाम शेतीक्षेत्रावर होत असून त्यात सातत्याने या पुढे वाढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या पुढे हे परिणाम गंभीर समस्या निर्माण करतील. विशेषतः कोरडवाहू भागात हे परिणाम जास्त असणार आहेत. असतील. त्यासाठी हवामान बदलाच्या अनुषंगाने शेतीमधून शाश्वत उत्पन्नासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
हवामान बदलामुळे पिकांच्या उत्पादकतेत घट होत असून शेती अशाश्वत झाली आहे. जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतीस अपुरा पाणीपुरवठा उपलब्ध होत आहे. गारपीट आणि अवेळी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. खरिपात दुबार पेरणीची वेळ येत आहे. मोसमी पावसातील अनिश्चिततेमुळे आणि पुरेशा ओलाव्याअभावी रब्बीचे क्षेत्रही कमी होत आहे.
भारतीय शेतीच्या संवेदनशीलतेचे मूल्यांकन
भारतीय कृषी संशोधन परिषदेने देशातील शेतीवरील हवामान बदलांच्या प्रभावाकडे लक्ष देण्यासाठी २०११ मध्ये निकरा( NICRA) हा नेटवर्क प्रकल्प सुरू केला. कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि आयसीएआरचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय देखरेख समितीद्वारे या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.
ज्यामध्ये केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांचे प्रतिनिधित्व निमंत्रित सदस्यांनी केले. या समितीने बदलत्या हवामानानुसार भारतीय शेती अधिक परिस्थिती अनुरूप लवचीक बनविण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय एखादी तज्ज्ञ समिती नियमितपणे या प्रकल्पाचा आढावा घेते.
हवामान बदलाप्रति भारतीय शेतीच्या संवेदनशीलतेचे मूल्यांकन भारतीय कृषी संशोधन परिषदेने हाती घेतले आहे. हे मूल्यांकन भारतातील ५७३ ग्रामीण जिल्ह्यांसाठी आहे. (केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप वगळता). संवेदनशीलतेच्या विश्लेषणाच्या आधारे, ५७३ ग्रामीण जिल्ह्यांपैकी १०९ जिल्हे हे अति जोखीम जिल्हे आहेत, तर २०१ जिल्हे जोखीम जिल्हे आहेत.
शेतीवर हवामान बदलाचा परिणाम
गेल्या तीन दशकांमध्ये संपूर्ण भारतात तापमान आणि अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे हवामानात लक्षणीय बदल दिसून आला आहे. यामुळे वेगवेगळ्या वर्षांत प्रमुख पिकांच्या उत्पादनात चढ-उतार होत गेले. एनआयसीआरए या संस्थेच्या अंतर्गत भारतीय शेतीवर हवामान बदलाच्या परिणामाचा अभ्यास केला गेला. त्यामध्ये पुढील निरीक्षणे दिसून आली आहेत.
२०५० आणि २०८० मध्ये भारतामध्ये पर्जन्याधारित भाताच्या उत्पादनात किरकोळ (<२.५%) घट आणि सिंचन तांदळाच्या उत्पादनात २०५० मध्ये ७ टक्के आणि २०८० मध्ये १० टक्के घट होण्याचा अंदाज आहे.
गव्हाचे उत्पादन २१०० मध्ये ६ ते २५ टक्के आणि मक्याचे उत्पादन १८ ते २३ टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे.
हवामानाचा हरभरा पिकाला फायदा होण्याची शक्यता असून उत्पादनात २३ ते ५४ टक्के वाढ होऊ शकेल.
जल,मृद संधारणाच्या उपाययोजना
महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियानाद्वारे दरवर्षी ५,००० गावात साखळी बंधारे व तळी तयार करून पाणी समस्या सोडवण्याचे अभियान सुरू केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जलसंधारण व पाणीसाठा होऊन भूगर्भातील पाणीपातळी वाढून कोरडवाहू भागातील पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्नावर मात करता येईल. बंधारे बांधून पाणी आडविणे या काळात गरजेचे आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. या कामात लोकसहभाग महत्वाचा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.