Jayakwadi Dam : राज्यातील अनेक धरणे काठोकाठ भरण्याच्या दिशेने; जायकवाडीतील पाणीसाठा ८९ टक्के

Jayakwadi Dam Water Storage : गेल्या तीन ते चार दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे मराठावाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८९ टक्क्यांच्या बाहेर गेला आहे.
Jayakwadi Dam
Jayakwadi DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात पडलेल्या दमदार पावसामुळे राज्याच्या सर्व धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यातील सर्व प्रकल्पांचा पाणीसाठा ८१.६२ टक्के झाला आहे. तर मराठावाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८९ टक्क्यांच्या बाहेर गेला आहे. यामुळे मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

राज्यातील धरणे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे भरली आहेत. तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील महत्वाच्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यातील सर्व लहान, मध्यम आणि मोठ्या अशा २९९७ प्रकल्पांमधील पाणीसाठा ८१.६२ टक्के झाला आहे. तर सर्व प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ३३ हजार ०५६. ६२ दश लक्ष घन मीटर (द.ल.घ.मी) पोहटचला आहे.

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam : जायकवाडीत ८९ हजार क्युसेकने पाणी आवक सुरू

राज्यातील विभागनिहाय पाणीसाठा

१) नागपूर विभागातील ३८३ प्रकल्पांमधील पाणीसाठा ८१.८७ टक्क्यांवर गेला असून, धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ३७७१.२१ दश लक्ष घन मीटर (द.ल.घ.मी)झाला आहे.

२) अमरावती विभागातील २६४ प्रकल्पांमध्ये ३१६०.१३ द.ल.घ.मी उपयुक्त पाणीसाठा ८३.५७ टक्के आहे.

३) छत्रपती संभाजीनगर विभागातील ९२० धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा झाला असून तो ६०.३८ टक्के आहे. उपयुक्त पाणीसाठी ४३८४.२१ द.ल.घ.मी आहे.

४) नाशिक विभागात जुलै, ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे ५३७ प्रकल्पांमध्ये ७६.३४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर एकूण पाणीसाठा ५३४७.६१ द.ल.घ.मी वर गेला आहे.

५) पुणे विभागात देखील गेल्या दोन महिन्यात चांगला पाऊस झाला असून पाणीसाठा ९०.४४ टक्क्यांवर आला आहे. तर एकूण पाणीसाठा १६ हजार ९१८.०३ द.ल.घ.मीवर पोहचला आहे.

६) कोकण विभागातील धरणे ऑगस्टच्या सुरुवातीलाच भरली होती. येथील १७३ प्रकल्पांमधील पाणीसाठा ९३.२३ टक्के झाला असून, एकूण पाणीसाठा ३६२३.०५ दलघमी इतका झाला आहे.

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam : जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा २९.३५ टक्क्यांवर

छत्रपती संभाजीनगर विभागात पाणीसाठा

राज्याच्या विविध जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र छत्रपती संभाजीनगर विभागाला पावसाची वाट पाहावी लागली होती. पण गेल्या चार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातील पाणीसाठा ६०.३८ टक्क्यांवर पोहचला आहे. विभागातील मोठ्या ४४ प्रकल्पांतील पाणीसाठा ७४.१० टक्के झाला असून मध्यम स्वरूपाच्या ८१ प्रकल्पांतील पाणीसाठा ५०.५१ टक्क्यांवर आला आहे. तर लहान ७९५ प्रकल्पांमध्ये जेमतेम ३०.४० टक्के पाणीसाठा झाला आहे.

जायकवाडीत ८९ टक्के पाणीसाठा

गेल्या चार-पाच दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे येथे पाणीच पाणी झाले असून जायकवाडी प्रकल्पाचा उर्ध्वभाग असलेल्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडी धरणाकडे सोडले गेले आहे. यामुळे जायकवाडीतील पाणीसाठा ८९.३३ टक्क्यांवर आला आहे. सध्या धरणात एकूण पाणीसाठा २६७७.३७ द.ल.घ.मी झाला असून धरणातून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर सध्या जायकवाडी धरणाची काठोकाठ भरण्याकडे वाटचाल सुरू असल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com