Jayakwadi Dam : माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडीतून विसर्ग

Majalgaon Water Project : आला. जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून सुरुवातीला १०० क्युसेकने हा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
Jaykwadi Dam
Jaykwadi DamAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : गोदावरीतून पाण्याची आवक वाढल्याने झपाट्याने पाणीसाठा वाढत असलेल्या जायकवाडी प्रकल्पातून शुक्रवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पाकरिता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून सुरुवातीला १०० क्युसेकने हा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

जायकवाडीचे कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार पैठण उजवा कालव्यातून १०० क्युसेकने सुरू करण्यात आलेला हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असल्याच जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जायकवाडीच्या उजवा कालवा परिसरातील साधन-सामुग्री, मालमत्ता-जनावरे आदींचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने सूचित केले आहे.

Jaykwadi Dam
Jayakwadi Dam : जायकवाडीत ८९ हजार क्युसेकने पाणी आवक सुरू

अकरा मोठ्या प्रकल्पांत १६९.५० टीएमसी पाणी

मराठवाड्यातील जायकवाडीसह ११ मोठ्या प्रकल्पांत १६९.५० टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे. यामध्ये जायकवाडीतील ८४.२९१ टीएमसी पाणीसाठासह निम्न दुधना प्रकल्पातील ५.६७१ टीएमसी, येलदरी १६.१६७ टीएमसी, सिद्धेश्वर ८.२२५ टीएमसी, माजलगाव ४.७३९, टीएमसी, मांजरा ४.१०३ टीएमसी, पेनगंगा ३३.६५१ टीएमसी, मानार ५.१८८ टीएमसी, निम्न तेरणा २.१५६ टीएमसी, विष्णुपुरी २.८६८ टीएमसी व सीना कोळेगावमधील २.४४५ टीएमसी पाणीसाठ्याचा समावेश आहे.

तूर्त चिंता मिटली

जायकवाडीत नेमका काळ किती हा प्रश्न अनुत्तरीत आहे. तरी अलीकडच्या काही दिवसात पावसाच्या झालेल्या कृपेमुळे गोदावरीतून जायकवाडीसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली व होते आहे. त्यामुळे तुर्त जायकवाडीवरून पाणीपुरवठा योजनेद्वारे होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची चिंता मिटली आहे.

Jaykwadi Dam
Jayakwadi Dam : राज्यातील प्रमुख धरणांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा; जायकवाडी ३१ टक्क्यांवर

माहितीनुसार तुर्त जायकवाडीवरून छत्रपती संभाजीनगरसाठी दोन, जालना, पैठण, नेवासा, कापूर, पिंपळवाडी, लोहगाव, आपेगाव, जामगाव, कायगाव, बगडी, शहर टाकळी, प्रवरासंगम, घोगरगाव, गळनिंब, शेवगाव पाथर्डी, बोधेगाव अशा जवळपास २० व औद्योगिकसाठी ७ अशा एकूण २७ बिगर सिंचनासाठीच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. १५ ऑक्टोबरला झालेल्या पाणीसाठ्याच्या अनुषंगाने सिंचनासाठी रब्बी व उन्हाळी आवर्तने किती मिळतील याचाही निर्णय होईल.

जायकवाडीचा पाणीसाठा ८४.२९ टीएमसीवर

गोदावरीच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असलेल्या जायकवाडीतील एकूण पाणीसाठा शुक्रवारी (ता. ३०) सकाळी सहाच्या सुमारास ८४.२९ टीएमसीवर पोहोचला. शिवाय उपयुक्त पाणीसाठा ही ५८.२३ टीएमसीवर पोहोचला होता.

जायकवाडीची एकूण पाणीसाठा क्षमता १०२.७२ टीएमसी असून उपयुक्त पाण्यासाठी क्षमता ७६.६५ टीएमसी आहे. त्यामुळे क्षमतेच्या तुलनेत जायकवाडीत ७५.९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्याचवेळी शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास जायकवाडीत ५१ हजार ७२१ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com