Jaykwadi Dam
Jaykwadi DamAgrowon

Jayakwadi Dam : जायकवाडीत ८९ हजार क्युसेकने पाणी आवक सुरू

Dam Water Storage : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील पाण्याची आवक सोमवारी (ता. २६) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुमारे ८९,२१८ क्युसेकने सुरू होती.
Published on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील पाण्याची आवक सोमवारी (ता. २६) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुमारे ८९,२१८ क्युसेकने सुरू होती. गत काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच नाशिक, नगर भागांतील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीतील पाण्याची आवक सातत्याने वाढत गेली आहे.

जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार, जायकवाडीची एकूण पाणीसाठा क्षमता १०२.७२ टीएमसी इतकी आहे. यामध्ये ७६.६५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे. २६ ऑगस्टच्या दुपारी १२ वाजताच्या आकडेवारीनुसार जायकवाडीत एकूण ६२.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामध्ये ३६.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश होता.

Jaykwadi Dam
Dam Water Discharge : धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू

हा उपयुक्त पाणीसाठा एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमतेच्या ४७.२७ टक्के इतका आहे. त्याचवेळी प्रकल्पात दोन तासांत ८९,२१८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. २४ ऑगस्टला सहा वाजेच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पातील पाण्याची आवक २७ हजार ५६२ क्युसेकने सुरू होती त्यावेळी प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ५५.१५ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा २९.८ टीएमसी झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत प्रकल्पातील पाण्यासाठीच्या आवकेमध्ये व एकूण पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

माहितीनुसार, जायकवाडीच्या दिशेने सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास भंडारदरामधून ८९४३ क्युसेक, निळवंडी ९६४७ क्युसेक, वाकीमधून १० हजार क्युसेक, ओझरवेअरमधून १४, ५५४ क्युसेक, आढाळामधून १४३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हा सर्व विसर्ग नांदूर मधमेश्वर केटी वेअरच्या माध्यमातून गोदावरीच्या दिशेने ३५ हजार ८८४ क्युसेकने सुरू होता.

Jaykwadi Dam
Nashik Dam Water : नाशिकमधील धरणांतून विसर्ग सुरू

त्याचवेळी गंगापूरमधून ७२२४ क्युसेक, दारणा १०१२० क्युसेक, भावली ५८८ क्युसेक, भाम २५६२ क्युसेक, गौतमी गो २५६० क्युसेक, वालदेवी १८३ क्युसेक, वाकी ६०८ क्युसेक, कडवा ४१३२१क्युसेक, नांदूर मध्यमेश्वर वेअर ६९ हजार ३६७ क्युसेक, भोजपूर १५२४, होळकर ब्रीज १३ हजार ४६ क्युसेक, पालखेड २०८९० क्युसेक, करंजवण ९९०८ क्युसेक, वाघाड ८०४ क्युसेक, पुणेगाव ३०० तर ओझरखेड मधून ४९५२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

नांदूर मधमेश्वर वेअर येथे गोदावरीचे सर्व पाणी एकत्र मोजले जाते. त्या ठिकाणावरून जायकवाडीत पोहोचायला पाण्याला जवळपास २६ तास लागतात. मध्यमेश्वर केटी वेअर येथे प्रवराचे संपूर्ण पाणी एकत्र मोजले जाते. त्या ठिकाणावरून पाण्याला जायकवाडीत पोहोचण्यासाठी जवळपास नऊ तासांचा अवधी लागतो. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात आणखी झपाट्याने वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे.

पावसाने घेतली विश्रांती

मराठवाड्यात रविवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांपर्यंत जोर धरून बसलेल्या पावसाचा जोर सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ओसरल्याचे चित्र होते. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांतील मोजक्याच मंडलांत तोही तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. दुपारी ३ पर्यंत ढगांची आकाशात गर्दी ऊन सावलीचा खेळ सुरू होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com