Water Scarcity : खोडाळ्यातील तलावाने गाठला तळ

Water Crisis : अर्धा मोखाडा तालुका पाणीटंचाईचा सामना करत आहे. तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीची एकमेव नळपाणीपुरवठा योजना यशस्वी आहे.
Water Lake
Water LakeAgrowon

Mumbai News : अर्धा मोखाडा तालुका पाणीटंचाईचा सामना करत आहे. तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीची एकमेव नळपाणीपुरवठा योजना यशस्वी आहे. मात्र, सध्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठला आहे. तलावात केवळ गाळाचे पाणी शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांना गाळ आणि चिखलमिश्रित पाण्याचा नळाद्वारे पुरवठा होत आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मोखाडा तालुक्यातील आदिवासी गावपाडे, वस्त्यांमधील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहेत. तालुक्यातील काही टंचाईग्रस्त गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत आणि बोअरवेल आटल्या आहेत. पाणीसाठा आटल्याने बहुतांश नळपाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची तहान भागवण्यासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शाश्वत पाणीसाठा आणि योग्य नियोजनामुळे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीची नळपाणीपुरवठा योजना सुरू आहे.

Water Lake
Water Crisis : पालघरमध्ये पाणीटंचाईचे संकट

विकतच्या पाण्याने भागते तहान

नळाला दूषित पाणी येत असल्याने अनेकांना विकतच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे. टमटम अथवा पाणीपुरवठा करत असलेल्या वाहनातील ५० लिटरच्या ड्रमच्या पाण्यासाठी ५० रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे. तसेच एका २० लिटर पाण्याच्या जारसाठी ४० रुपये देऊन ग्रामस्थ आपली तहान भागवत आहेत. ज्यांची पाणी विकत घेण्याची ऐपत नाही, त्या गरीब कुटुंबातील महिलांना अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरच्या विहिरीवरून पायपीट करत पाणी आणावे लागत आहे.

तलावात केवळ चिखल मिश्रित पाणी शिल्लक

गावाला पाणीपुरवठा करणारा गाव तलावाने तळ गाठला आहे. तलावात केवळ गाळ आणि चिखलमिश्रित पाणी शिल्लक राहिले आहे. याच पाण्याचा ग्रामस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना गाळमिश्रित दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना पोटाचे विकार जडत आहेत. अशा दूषित पाण्यामुळे साथींचे आजार बळावण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

‘जलजीवन मिशन’ योजना रखडली

जलजीवन मिशन योजनेंतर्गत संपूर्ण तालुक्याचे काम ईगल इन्फ्रा इंडिया या कंत्राटदाराने घेतले आहे. मार्च २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यावर्षीही तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावालाही त्याचा फटका बसल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. किंबहुना, दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.

Water Lake
Water Shortage : राज्यातील दोन कोटी पशुधन तहानलेले
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी जास्त क्षमतेच्या आहेत. त्यामुळे नळाद्वारे गाळमिश्रित पाणी येत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पंचायत समितीकडे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
देवीदास दोंदे, ग्रामसेवक, खोडाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com