Sharad Pawar : सेंद्रिय, विषमुक्त शेतीचे प्रश्‍न केंद्र सरकारकडे मांडणार

Sharad Pawar : सेंद्रिय व विषमुक्त शेतीतील प्रश्‍न मोर्फा संघटनेच्या माध्यमातून समजून घेऊन ते प्रश्‍न राज्य व केंद्र सरकार पुढे मांडणार असून, त्याची सोडवणूक होईपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करू, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सेंद्रिय व विषमुक्त शेतीतील प्रश्‍न मोर्फा संघटनेच्या माध्यमातून समजून घेऊन ते प्रश्‍न राज्य व केंद्र सरकार पुढे मांडणार असून, त्याची सोडवणूक होईपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करू, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी (ता.१९) येथे व्यक्त केले.

मंगळवेढा येथे महाऑरगॅनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन अर्थात मोर्फा व आम्रपाली ॲग्रो टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सेंद्रिय शेती कार्यशाळेत श्री. पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, विठ्ठल शुगरचे अध्यक्ष अभिजित पाटील,

‘मोर्फा’चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, आम्रपाली ॲग्रो टुरिझमच्या संचालिका सुदर्शना आनंद लोकरे, ‘मोर्फा’चे संचालक हरिभाऊ यादव, पाणी संघर्ष समितीचे ॲड. भारत पवार, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, रणजित जगताप, संजय कट्टे, ‘मोर्फा’चे जिल्हाध्यक्ष संजय दिघे आधी उपस्थित होते.

Sharad Pawar
Organic Farming : लवकरच सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा येणार अस्तित्वात?

श्री. पवार म्हणाले, ‘‘सेंद्रिय व विषमुक्त शेतीमध्ये उत्पादनाबरोबर मार्केटिंगचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्याची विश्‍वासार्हता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शेती क्षेत्रात बदल होत आहे. त्या बदलाची नोंद घेऊन आपण पावले टाकली पाहिजे. मोर्फा संघटना राज्यात विषमुक्त व सेंद्रिय शेतीतील प्रश्‍न शासनाच्या निदर्शनास आणत आहे.

सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी आपण संबंधित मंत्र्यांबरोबर येणाऱ्या निवडणुकांचा कालावधी संपल्यानंतर बैठका घेऊन सेंद्रिय व विषमुक्त मालाचे उत्पादन वाढवणे व मार्केटिंगसाठी मदत करू,’’ असे पवार यांनी बोलताना आश्‍वासन दिले.

‘मोर्फा’चे अध्यक्ष पडवळे म्हणाले, ‘‘सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न आहेत. शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत. पण मार्केटिंगमध्ये शासनाच्या मदतीची अत्यंत गरज आहे. राज्याचे सेंद्रिय शेतीचे धोरण बनवण्यामध्ये पवार साहेबांचा महत्त्वाचा वाटा आहे. आमच्या प्रश्‍नासाठी आता केंद्राकडेही आपण जाण्याची तयार केली आहे, ही बाब आमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Sharad Pawar
Organic Farming : सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे

यापुढे आपणाला नैसर्गिक शेतीपेक्षा शाश्‍वत सेंद्रिय शेतीची गरज असून, त्या दृष्टीने मोर्फा संघटना राज्यामध्ये पावले टाकत आहे,’’ असेही पडवळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोर्फाचे संचालक हरिभाऊ यादव यांनी केले. या कार्यक्रमासाठी संतोष दुधाळ, नितीन मोरे, अनिल वगरे, संजय दवले, बाळासाहेब यादव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.

‘दुधाला उत्पादनखर्चावर दर हवा’

‘सेंद्रिय शेतीबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला अतिशय महत्त्व आहे. विषमुक्त व ॲण्टिबायोटिक दूध उत्पादन काळाची गरज असून, अशा दुधाला योग्य किंमत मिळण्यासाठी शासन व खासदार शरद पवार यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे.

दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला व ए टू मिल्क दुधाला चांगली बाजारपेठ मिळाल्यास सेंद्रिय शेती करणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल,’’ असे या वेळी पडवळे यांनी सांगितले.

एजीएनएसएलपी२०पी०३ मंगळवेढा, जि. सोलापूर येथील सेंद्रिय शेती कार्यशाळेत बोलताना खासदार शरद पवार या वेळी व्यासपीठावर मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळे, सुदर्शना आनंद लोकरे, ॲड भारत पवार, हरिभाऊ यादव आदी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com