Team Agrowon
राज्याची सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरण यंत्रणा लवकरच अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणा या संस्थेची नोंदणी करण्यात आल्यानंतर आता ‘नॅशनल सेंटर फॉर ऑर्गेनिक ॲण्ड नॅचरल फार्मिंग’ या गाझीयाबाद येथील संस्थेच्या अधिस्वीकृतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
त्यांची मान्यता मिळताच राज्यातही सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचे काम गतिमान होणार आहे.
राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा ही बीजोत्पादकांसाठी काम करणारी स्वायत्त संस्था आहे. बीजोत्पादन शुल्कातूनच या या संस्थेतील कर्मचाऱ्यांचा पगार व इतर कामांसाठी लागणाऱ्या पैशाची सोय होते.
त्याच धर्तीवर आता सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. संस्था नोंदणी अधिनियमाअंतर्गत महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा या संस्थेची नोंदणी जानेवारी २०२३ मध्ये करण्यात आली.
त्यानंतर नॅशनल सेंटर फॉर ऑर्गेनिक ॲण्ड नॅचरल फार्मिंग या संस्थेकडे नोव्हेंबर २०२३ मध्ये अधिस्वीकृतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. या संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक डिसेंबर २०२३ मध्ये होणार होती.