Road Issue : रस्त्यांबाबत मोहोळ, बार्शीकरांच्या सर्वाधिक तक्रारी

PCRS : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहर व जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती योग्य पद्धतीने व्हावी. नागरिकांना चांगल्या वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पीसीआरएस अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
PCRS
PCRSAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहर व जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती योग्य पद्धतीने व्हावी. नागरिकांना चांगल्या वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पीसीआरएस अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपवर अवघ्या तीन दिवसांत ३६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, यातील सर्व तक्रारी या मोहोळ आणि बार्शी तालुक्यातील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यात रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहतुकीला त्रास होतो. इतकेच नव्हे तर पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता दाखवत आपल्या परिसरातील रस्त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन अॅप विकसित केले आहे. दीड वर्षांपासून अॅप निर्मिती आणि तांत्रिक पडताळणीचे काम सुरू होते. तरीही या ॲपबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या नाहीत. त्यामुळे ॲप डाऊनलोड होत नसल्याच्या तक्रारीही आहेत.

PCRS
Road Work Corruption : चिखलीतील पाणंद रस्त्यांच्या कामांत भ्रष्टाचार

ग्रामीणसह शहरी भागातील नागरिकांनी अधिकाधिक तक्रारी नोंदविण्यासाठी या अॅपचा वापर करावा, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवाहन करण्यात आले होते. २८ ऑगस्ट रोजी ॲपची सुरवात झाली. त्यानंतर तीन दिवसांत केवळ ३२ जणांनी हे ॲप डाऊनलोड केले. यावरून ३६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारी मोहोळ आणि बार्शी तालुक्यातील असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

PCRS
Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

ॲपमध्ये तांत्रिक अडचणी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्‍यांच्या तक्रारीसाठी ॲप तयार केले आहे. मात्र, हे ॲप डाऊनलोड होत नसल्याने आतापर्यंत केवळ ३२ मोबाईलवर ॲप सुरू झाले आहे. तक्रारी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली सुविधा फक्त नावालाच आहे. ॲप सुरूच होत नसल्याने जास्त तक्रारी येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या तांत्रिक अडचणी दूर करण्याची गरज आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागील तीन वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. खराब रस्त्याबाबत वाढत्या तक्रारींची नोंद घेऊन त्वरित दुरुस्तीकरिता हे ॲप सुरू करण्यात आले आहे. हे ॲप काही मोबाईलवर डाऊनलोड होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तीन दिवसांत ३२ जणांनी ॲप डाऊनलोड करून ३६ तक्रारी नोंदविल्या आहेत. त्यात मोहोळ व बार्शीतील २७ तक्रारींचे निरसन केले आहे.
संजय माळी, अधीक्षक अभियंता

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com