Road Work Corruption : चिखलीतील पाणंद रस्त्यांच्या कामांत भ्रष्टाचार

MLA Rahul Bondre : पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
Press Conference
Press ConferenceAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदार संघात सुरू असलेल्या सुमारे साडेतीनशे पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. कंत्राटदार व संबंधितांमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडियो क्लिप त्यांनी ऐकवत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

Press Conference
Panand Road : शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून केले पाणंद रस्ते

सोमवारी (ता.५) झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बोंद्रे म्हणाले, की मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेमध्ये झाडे तोडणे, काळी माती खोदणे, कच्चा मुरूम खोदणे, त्यानंतर पक्का मुरुम टाकून परत ४० मिलिमीटर खड़ी पसरविणे, मुरमाची दबाई करणे अशी कामे अंदाजपत्रकात होती.

Press Conference
Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

मात्र, केवळ ४० एमएम खडीचा एक थर वर टाकण्यात आला. शिवाय एवढ्या कामाचे २५ लाखांचे देयके काढण्यात आली. चिखली मतदार संघात सुरू असलेल्या ३५० पाणंद रस्त्याच्या कामांमध्ये ५६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. २५ लाखांचा रस्ता केवळ आठ लाखांत करून त्यावरील पैशांचा अपहार झाल्याचेही म्हणणे होते.

ऐकविली संभाषणाची ध्वनिफित

पाणंद रस्त्याच्या कामांसंदर्भात दोन व्यक्तींमध्ये सुरू असलेल्या संभाषणाची ध्वनिफितही बोंद्रे यांनी पत्रकारांसमोर ऐकवली. म्हसल्याचे सर्व रस्ते तुम्हीच करा. ८-८ लाखांत आम्ही रस्ते केले. ताई आणि साहेबांनी मजुरांना भेट दिली असे गृहीत धरून मजुरांकडून पैसे परत घ्यायचे नाही, असे ती व्यक्ती बोलत आहे. संभाषणातील साहेब आणि ताई कोण आहेत, याचाही शोध घेतला जावा अशी मागणी माजी आ. बोंद्रे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com