ZP Construction Department : बांधकाम विभागाने पुन्हा पाठविला पूरहानीचा प्रस्ताव

Bridge Damages Update : गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक किलोमीटरचे रस्ते खरडून गेले, तर महत्त्वाच्या पुलांचे मोठे नुकसान झाले.
ZP Amravati
ZP AmravatiAgrowon
Published on
Updated on

Amravati News : गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक किलोमीटरचे रस्ते खरडून गेले, तर महत्त्वाच्या पुलांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून शासनाकडे वारंवार निधीची मागणी करून सुद्धा प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने पुन्हा एकदा रिव्हाईस (सुधारित) प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील खरडलेल्या रस्त्यांसाठी सात कोटींची मागणी केली.

ZP Amravati
Kolhapur ZP Subsidy : जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर मिळणार कडबाकुट्टी, शेळी गट; असा करा अर्ज

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ८५ किलोमीटरचे रस्ते पूर्णपणे खरडून गेले होते तर १५ पूल खचले. त्यांच्या दुरुस्तीसाठी सात कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. विशेष म्हणजे, एका वर्षापासून शासनाकड़ून त्यावर कुठलेही उत्तर आले नाही.

एक पैसाही जिल्हा परिषदेला देण्यात आला नाही. पर्यायाने ग्रामीण भागातील रखडलेले रस्ते आजही आहे त्याच स्थितीत आहेत. मागणी करण्यात आलेल्या निधीच्या प्रस्तावात खरडलेल्या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी ५ कोटी ६० तर पुलांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ४० लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.

ZP Amravati
Pune ZP : ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे पुणे झेडपीसमोर काम बंद आंदोलन

गतवर्षी अमरावती, चांदूररेल्वे, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, धारणी या उपविभागांमध्ये जोरदार अतिवृष्टीची नोंद झाली होती. याच तालुक्यामध्ये रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

दृष्टिक्षेपात पूरहानी

खराब रस्त्यांची लांबी ९५.४२

बाधित पूलसंख्या १५

दुरुस्तीसाठी निधी सात कोटी

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून २०२३-२४ वर्षातील पूरहानीचा प्रस्ताव शासनाला पुन्हा पाठविण्यात आला आहे. जवळपास सात कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. आमचा पाठपुरावा सुरू आहे.
दिनेश गायकवाड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जि. प.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com