Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Panand Road Scheme : नाशिक जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून तब्बल ९८८ शिवार रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांना २०२१ व २०२२ मध्ये मंजुरीही मिळाली. मात्र, आतापर्यंत केवळ शंभरच्या आसपास कामांना सुरुवात झाली आहे.
Panand Road
Panand RoadAgrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून तब्बल ९८८ शिवार रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांना २०२१ व २०२२ मध्ये मंजुरीही मिळाली. मात्र, आतापर्यंत केवळ शंभरच्या आसपास कामांना सुरुवात झाली आहे. ही मंजूर कामे सुरू होण्याची अडचण असताना या नवीन आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील इतर कामे सुरू असल्याचे कारण देत गटविकास अधिकारी स्तरावरून पाणंद रस्त्यांची कामांना परवानगी नाकारली जात आहे. यातच, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे सांगत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८५० हून अधिक कामे ठप्प आहेत.

Panand Road
Panand Road : शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून केले पाणंद रस्ते

राज्य सरकारने २०२१ मध्ये मातोश्री पाणंद रस्ते योजना सुरू केली. या योजनेतील कामे रोजगार हमी योजनेतून करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार ६० टक्के कामे मजुरांकडून, तर ४० टक्के कामे यंत्राने करण्याचे निश्‍चित करून रोजगार हमीमंत्र्यांनी या योजनेतील कामांना मंजुरी दिली. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर जानेवारी २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश दिले. त्यानंतरही मार्च, एप्रिल व जून २०२२ मध्ये आणखी कामे मंत्रालयस्तरावरून मंजूर करून त्याच्या याद्या जिल्हा परिषदेकडे पाठवल्या.

Panand Road
Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

त्यानुसार मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून जिल्ह्यात ९८८ कामे मंजूर झाली असून, त्यातील केवळ १०० कामे आतापर्यंत सुरू झाली आहेत. त्यात १ जानेवारी २०२३ पासून केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेतून करण्यात येणाऱ्या सार्वजनिक लाभाच्या योजनांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची दोनवेळा ऑनलाइन हजेरी घेणे बंधनकारक केले आहे. त्यातच ग्रामीण भागात ॲपद्वारे हजेरी नोंदवण्यासाठी इंटरनेटची रेंज नसणे, ॲपवर फोटो अपलोड करण्यास अडचणी येणे व फोटो अपलोड केले तरी त्याची ॲपवर नोंद न होणे आदी कारणांमुळे या शिवार रस्त्यांच्या कामांचा वेग मंदावला आहे.

सरपंच तसेच व्हेंडरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे चकरा

गेल्या वर्षभरात ६०:४० चे प्रमाण राखण्याच्या नावाखाली नवीन पाणंद रस्ते सुरू करण्यास गटविकास अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर मातोश्री पाणंद रस्ते योजनेतील रस्त्यांची कामे सुरू करण्यास व्हेंडरला परवानगी द्यायची नाही, असा अलिखित नियम केला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांची कामे सुरू झाली नाही. यंदा नवीन वर्षात कामे सुरू करण्यासाठी सरपंच तसेच व्हेंडर गटविकास अधिकारी यांच्याकडे चकरा मारत असताना त्यांना आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे कामे सुरू करण्यास परवानगी देता येणार नाही, असे उत्तर दिले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com