Criticism of Govt: नुकसानीच्या मदतीवेळी सरकार झोपलेले; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची टीका

Harshvardhan Sapkal criticizes: राज्यातील शेतकरी संकटात असताना मेमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजप युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे.
Harshvardhan Sapkal
Harshvardhan Sapkal Agrowon
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील शेतकरी संकटात असताना मेमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजप युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत पीकविमा योजना लागू करण्याबरोचर नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी (ता. १४) केली.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत सपकाळ म्हणाले, की शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळणारी एक रुपयात पीकविमा योजना सरकारने बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. पीक कापणीवर आधारित नवी विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नाही. पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे, ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक सरकारमध्ये नाही. या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या दूर करून योजना राबवली पाहिजे पण सरकारने योजनाच रद्द केली. एक रुपयात पीकविमा योजना ही पुन्हा लागू करावी.

Harshvardhan Sapkal
Hindi Language Imposition: हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मागणी

खरिपासाठी सरकारची तयारी नाही..

खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बी-बियाणे, खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी आहे, पण सरकारच्या कृषी विभागाची काहीच तयारी दिसत नाही. बोगस बियाणे विकून व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. राज्यभर बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे खते, बियाणे लिंकिंग करून व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. सरकार फक्त कारवाईच्या घोषणा करते पण कारवाई काही करत नाही. आतातरी सरकारने जागे व्हावे व लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

निधी वळवणे असंविधानिक

भाजप युती सरकारचा कारभार म्हणजे सावळा गोंधळ आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी या सरकारने ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी वळवला हे असंविधानिक आहे. दलित, आदिवासी, ओबीसी समाजासाठी असलेला निधी सरकारने वळवला आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. यासंदर्भात राज्यपालांनी सरकारला जाब विचारला पाहिजे. योजनांसाठी निधी नाही हे चित्र राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याचे द्योतक आहे. राज्य सरकारकडे निधी नसेल तर फडणवीस, शिंदे व अजित पवार यांनी केंद्राकडून राज्यासाठी विशेष पॅकेज आणून ‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Harshvardhan Sapkal
Crop Insurance: पीक विम्याचा ‘फडणवीस पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ

शस्त्रसंधीबाबत उत्तर द्यावे

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवावी यासाठी सर्व देश एकजूट झाला होता. काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे कंबरडे मोडत असताना अचानक शस्त्रसंधीचा निर्णय घ्यावा लागला यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपले जवान शर्थीने लढत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा कशी केली?

भारत पाकिस्तानमध्ये अमेरिका मध्यस्थी करत आहे का? तसे असेल तर शिमला करार रद्द केला आहे का? डोनाल्ड ट्रम्प यांनी जे जाहीरपणे सांगितले ते भारत सरकारला मान्य आहे का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देशातील जनतेला सरकारने द्यावीत, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. सर्वपक्षीय बैठकीलाही पंतप्रधान उपस्थित नव्हते, त्यामुळे जनतेच्या मनात शंका आहेत, त्यांचे समाधान करावे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com