Hindi Language Imposition: हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मागणी

Congress State President Harshvardhan Sapkal Demand: शालेय शिक्षणात हिंदी सक्तीवरून काँग्रेसने भाजप सरकारवर जोरदार टीका केली असून, “मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, आणि पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीवरच घाला आहे,” असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Harshvardhan Sapkal
Harshvardhan Sapkal Agrowon
Published on
Updated on

Mumbai News: ‘‘मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा,’’ अशी मागणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (ता. १८) केली.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, ‘‘एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा व दुसरीकडे बोलीपासून दूर ठेवायचे ही दुटप्पी भूमिका भाजपची आहे. भाषा ही संवादाचे साधन आहे, संस्कृती आहे. एकाचवेळी तीन भाषांची सक्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी इतर विषयांचा अभ्यास कसा करायचा.

Harshvardhan Sapkal
Farmer Loan Waiver: ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पत असेल, तर शेतकऱ्यांसाठी पॅकेज आणा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

या सक्तीमुळे मुले मूलभूत ज्ञानापासून वंचित राहतील. प्रादेशिक भाषांचा सन्मान झाला पाहिजे व इतर भाषांचाही आदर आहे पण भाजपाला प्रादेशिक संस्कृती व भाषा संपवायच्या आहेत. या निर्णयामुळे इतर भाषा शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा भारतीय जनता पक्षाचा हा अजेंडा असून अशा सक्तीला काँग्रेसचा विरोध आहे.’’

दक्षिण भारतात हिंदी भाषेला तीव्र विरोध आहे, मग महाराष्ट्रात सक्ती का, भाषा लादण्याचा हा प्रकार देशाचे तुकडे पाडण्यासाठी आहे का, आणि मराठी भाषा बोलणारे हिंदू नाहीत का, असा सवाल करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा कारभार ज्या भाषेत चालत होता ती भाषाच भारतीय जनता पक्ष नष्ट करायला निघाले आहेत,’ अशा शब्दात सपकाळ जोरदार टीका केली.

Harshvardhan Sapkal
Resignation Demand of Agriculture Minister: राज्यपालांनी कृषिमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्यावा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

‘बीडमधील अत्याचार का थांबत नाहीत?’

‘‘बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येची घटना जगाने पाहिली आहे. बीडमध्ये आका गँग, खोके गँग अशा गँग कार्यरत असून बीडमधील अत्याचार थांबत नाहीत. अंबाजोगाई येथे सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या एका तरुणीला गावातील ध्वनी प्रदूषणाविरोधात कार्यालयीन तक्रार केल्याच्या कारणावरून सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन रिंगण करून बेदम मारहाण केली.

काठ्या आणि लोखंडी पाइप वापरून झालेल्या हल्ल्यामुळे महिला बेशुद्ध पडली. तिला केवळ एका रात्रीत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. हा प्रकार अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे. एका वकील महिलेला जर संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय, असा प्रश्न विचारून सरकारकडे थोडी लाज शरम बाकी असेल तर तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी व कठोर शिक्षा करावी,’’ अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com