Reciprocal Tariff USA : दुधारी तलवार चालवून डोनाल्ड ट्रम्प काय साधणार?

Global Trade War : जगाने आमचे कारखाने उद्‍ध्वस्त केले. आमच्या लोकांचे रोजगार पळवले. आमच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली. म्हणून दोन एप्रिल हा दिवस आपल्यासाठी मुक्ती दिन (लिबरेशन डे) असेल.’
Donald Trump
Donald TrumpAgrowon
Published on
Updated on

American Trade Policy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच जवळपास सर्व राष्ट्रांमधून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर ‘जशास तसे’ करांची म्हणजे ‘रेसिप्रोकल टेरीफ’ची घोषणा केली. त्या वेळी ते म्हणाले, ‘अमेरिकेला इतर राष्ट्रांनी अनेक दशके लुटले आहे. ती लूट आजपासून थांबणार आहे. जगाने आमचे कारखाने उद्‍ध्वस्त केले. आमच्या लोकांचे रोजगार पळवले. आमच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली. म्हणून दोन एप्रिल हा दिवस आपल्यासाठी मुक्ती दिन (लिबरेशन डे) असेल.’

गेली जवळपास शंभर वर्षे जगातील महासत्ता म्हणून जगाच्या अस्तित्वाच्या आर्थिक, व्यापारी, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंध, लष्करी संबंध, परकीय चलन, भांडवल गुंतवणुकी, सॉफ्ट पॉवर अशा सर्व आयामांवर निर्णायक मुद्रा उमटवणाऱ्या आणि अनेक सार्वभौम देशांवर हल्ले करणाऱ्या, युद्धात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या, जगातील सर्वांत संहारक शस्त्रांचे उत्पादन करून ते जगभर विकणाऱ्या, अनेक देशांच्या अंतर्गत कारभारात प्रत्यक्ष हस्तक्षेप करणाऱ्या ताकदवान अमेरिकेचे ताकदवान राष्ट्राध्यक्ष जगाबद्दल अशी तक्रार करत आहेत (!)

Donald Trump
Trade War: व्यापार युद्धातील संकटे अन् संधी

अमेरिकेने जाहीर केलेले आयात कर म्हणजे दुधारी तलवार आहे. त्याचे विपरीत परिणाम अमेरिकी अर्थव्यवस्थेवर देखील होणार आहेत.

१) आयात केलेल्या वस्तूंच्या ‘लॅंडेड प्राइस’मध्ये तो आयात कर अंतर्भूत केला जातो. यजमान देशातील जो ग्राहक ती आयात केलेली वस्तू विकत घेईल त्यांना चढ्या किमतीत ती वस्तू विकत घ्यावी लागते. दुसऱ्या शब्दांत आयात कर वाढविल्यास आयात वस्तू महाग होतात. अमेरिकन ग्राहक अक्षरशः अनेकानेक वस्तुमालासाठी (उदा. तयार कपडे, वाहने, औषधे, अन्नपदार्थ, पोलाद , ॲल्युमिनिअम इ.) आयात वस्तूंवर अवलंबून आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या वाढीव आयात करांचा प्रत्यक्ष परिणाम अमेरिकेत महागाई वाढण्यात होणार आहे. ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकी नागरिकांच्या उत्पन्नात कोणतीही नाट्यपूर्ण वाढ होण्याची शक्यता नसल्यामुळे वस्तुमालाची मागणी कमी होईल.

२) ट्रम्प यांनी आयातकरांनी संरक्षण दिल्यामुळे अमेरिकेतील उत्पादक अधिक उत्पादन करतील, त्यातून रोजगार निर्मिती होईल अशी थियरी मांडली जाते. पण मागणी कमी होणार असेल आणि अनिश्‍चितता असेल तर गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आपले निर्णय अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलतील.

३) कोणत्याही अनिश्‍चिततेत मध्यम, निम्न मध्यम आणि गरीब कुटुंबे उपभोग कमी करून बचतींवर भर देऊ लागतात. हे मानवी आहे. नॉर्मल काळात कुटुंबे जेवढे खर्च करतील त्यापेक्षा अनिश्‍चिततेमध्ये कमीच खर्च केला जातो.

Donald Trump
India US Trade War: अमेरिकेचे व्यापारयुद्ध : शेतीमाल बाजारातील संधी अन्‌ धोके!

४) अर्थव्यवस्थेत मागणीला चालना देण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँका व्याजदर कमी करतात. पण महागाई वाढणार असेल तर अमेरिकी केंद्रीय बँक व्याजदर कमी करण्याची शक्यता नाही.

५) ट्रम्प आयात कर केव्हा लावू शकतात, ज्या वेळी निर्यातदार त्याने बनवलेला वस्तुमाल अमेरिकेच्या बंदरांमध्ये उतरवतील तेव्हाच. समजा जगातील निर्यातदारांनी अमेरिकेला माल पाठवण्याऐवजी, व्यापार करण्यासाठी दुसरेच राष्ट्र शोधले तर? ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापारी आणि राजनैतिक धोरणांमुळे अमेरिकेच्या शत्रू राष्ट्रांतच नाही तर अमेरिकेच्या अनेक दशकांच्या मित्र राष्ट्रांत देखील अस्वस्थता आहे.

अमेरिकेच्या धोरणांचा फटका बसलेले देश त्याला प्रत्युत्तर देण्याचा सक्रिय प्रयत्न करू लागले आहेत. यातून नुकसान अमेरिकेचेच होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढविलेले आयात कर भविष्यात अमेरिकेलाच घायाळ करू शकतात. डोनाल्ड ट्रम्प खरे तर ‘डील मेकर’ आहेत. ते वाढविलेले आयात कर प्रत्येक राष्ट्राबरोबरील व्यापारी वाटाघाटींमध्ये ‘निगोशिएशन चीप’ म्हणून वापरतील आणि चाचपणी करत आयात कर ‘केस बाय केस’ कमी करण्याची शक्यता फेटाळता येत नाही. आयात करासंबंधीच्या अमेरिकेने काढलेल्या आदेशामध्ये तशा फटी ठेवल्याचे आढळून येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com