Agrowon New Year Edition : नवीन वर्षातील नित्यनूतन ‘ॲग्रोवन’

Farming Newspaper : नवे वर्ष २०२५ ची ॲग्रोवनची सुरुवात फारच विशेष आहे. या नव्या वर्षात पहिल्या पानापासून तर अगदी शेवटपर्यंत ॲग्रोवनमध्ये बदल दिसून येत आहे. अतिशय नीटनेटके असे नवीन वर्षातील प्रत्येक पानावरील बदल वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Agrowon Newspaper
Agrowon NewspaperAgrowon
Published on
Updated on

Agricultural Innovation : ‘ॲग्रोवन’ या कृषी दैनिकाचा पहिला अंक २० एप्रिल २००५ रोजी महाराष्ट्रात वाचकांसमोर आला. त्या दिवसापासून मी ॲग्रोवनचा नियमित वाचक आहे. देशातीलच नव्हे तर जगातील पहिले कृषी दैनिक असा नावलौकिक ॲग्रोवनला प्राप्त झाला आहे.

अगदी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या गरजा समोर ठेवून कंटेन्ट तसेच त्याच्या मांडणीत ॲग्रोवनमध्ये सतत बदल केले आहेत. नवे वर्ष २०२५ ची ॲग्रोवनची सुरुवात तर फारच विशेष आहे. या नव्या वर्षात पहिल्या पानापासून तर अगदी शेवटपर्यंत ॲग्रोवनमध्ये बदल दिसून येत आहे. अतिशय नीटनेटका असा हा नवीन वर्षातील अंक वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नवीन वर्षात विषय, सदरांची निवड करताना शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी अशा सर्वांना उपयुक्त राहील याची पूर्ण काळजी घेतलेली दिसते. संपादकीय पानावरील बदल तर खूपच प्रभावी ठरत आहे. त्याचे कारण असे की सतत एकच प्रकारची मांडणी, छपाई असेल तर वाचक पानावर खिळून राहत नाही.

Agrowon Newspaper
New Year 2025 : नवे वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद

म्हणून या पानावरील अग्रलेख व संपादकीय लेख यांची मांडणी आता आडवी केली आहे. कसदार लेखणीसोबत मांडणीत बदल झाल्याने हे पान आणखी आकर्षक झाले आहे. कोणत्याही वृत्तपत्राचा आत्मा हा संपादकीय पान असते शिवाय यावरच दैनिकाची विचार करण्याची दिशा ठरत असते. हा आत्मा नवीन रूपात पाहताना एक वाचक म्हणून मनस्वी आनंद होतो आहे.

शेतकरी यशोगाथा हाही ॲग्रोवन दैनिकाचा विशेष भाग! राज्यात कुठे शेतकरी नवीन प्रयोग करतात, याचा सुगावा राज्याच्या विविध भागांतील ॲग्रोवन पत्रकार घेतात. आणि मग ती नावीन्यता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरेल, अशा पद्धतीने ती यशोगाथा कव्हर करून पान ८ आणि ९ वर मांडली जाते. ॲग्रोवनमधील प्रसिद्ध झालेल्या यशोगाथांचा फायदा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना झाला आहे.

अक्षर लिपीमधील बदल किंवा अगदी पान एकवरील ‘मित्र ग्लोबल शिवाराचा...’ या टॅगलाइनचा ॲग्रोवन लोगो प्रथमतः सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. बातमी तसेच लेखांच्या मुख्य शीर्षकांबरोबर उपशीर्षके, कोट, इन्फो बॉक्स या सर्वांचीच स्टाइल, त्यातील रंगसंगती उत्तम आहे. मी मागील आठ दिवसांपासून वाचक या नात्याने ॲग्रोवनच्या नव्या रूपाचे बारकाईने निरीक्षण घेत आहे. त्यामुळे नवीन वर्षांत एका नित्यनूतन अंकांची अनुभूती आम्हाला येत आहे.

Agrowon Newspaper
New Year 2025 : नवे वर्ष, नव्या आशा-आकांक्षा

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाच विषय जेव्हा अंकात सात्त्विक रूपात नटतात, तेव्हा वाचक एक वेगळी अनुभूती घेतो; असा बदल वाचकांना आल्हाददायक वाटतो. असो ॲग्रोवन या दैनिकाचे नवे रूप वाचकांना आवडले तर आहेच, परंतु यापासून आमच्या सारख्या कृषी विस्तार सेवेत कार्य करणाऱ्या मंडळींना देखील एक प्रेरणा मिळाली आहे. शेतकरी सेवेत सातत्याने झोकून देत काम करीत कसे राहावे, हे ॲग्रोवनकडून मला शिकायला मिळाले.

ज्ञानेश्‍वर माउली म्हणतात, ‘‘अहो, रोज उगवणाऱ्या सूर्याला जसे शिळा म्हणता येत नाही, वाहत्या पाण्याला पारोसे म्हणता येत नाही, अगदी या दृष्टांताप्रमाणे जे दैनिक दररोज शेतकरी गरजेवर आधारित नवनवे विषय घेऊन त्यांची उत्तम मांडणी करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपड करते, त्या दैनिकाला जुने कसे म्हणता येईल. राज्यातील शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी संशोधक, कृषी विस्तारकर्ते यांच्याशी ॲग्रोवन दररोज भेटत नवीन संवाद साधत असतो.

असा हा दोन दशकांचा ॲग्रोवनचा प्रवास राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. शेतकऱ्यांचा एक विश्‍वासू सहकारी म्हणून ॲग्रोवनने ख्याती प्राप्त केली आहे. या नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ॲग्रोवनसोबत काम करणाऱ्या सर्वांना बळ मिळो हीच इच्छा. एखादे कार्य यशस्वी होण्यासाठी कसे वातावरण लागते, अशा ओवीने माझ्या मताची सांगता करतो...

तेथ सुगरणी आणि उदारे

रसज्ञ आणि जेवणारे

मिळती मग अवतरे हातू जैसा

माउली म्हणतात, ‘‘ज्या प्रमाणे स्वयंपाकात चतुर व उदार माता आणि यांच्या जोडीला रसज्ञ आणि भरपूर जेवणारे यांची जोडी मिळाली की वाढणारे व खाणारे अशा दोघांनाही अवसान येते. त्याप्रमाणे विविध रंगाने, अंगाने, अध्यात्माच्या सदराने ॲग्रोवन आमच्या पुढे येत आहे. वाचक म्हणून आमच्या रुचीत वाढ होत आहे.

रामेश्‍वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजी नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com