Ozarakheda Dam: ‘हतनूर’चे वाहून जाणारे पाणी ‘ओझरखेडे’त

Jalgaon Irrigation : पी नदीला आलेल्या पुराचे पाणी हतनूर धरणामधून वाहून जाते. मात्र आता ते पाणी नियोजनानुसार ओझरखेडा धरणात वरणगाव-तळवेल शेती सिंचनासाठी साठविण्यात येणार आहे.
Ozarakheda Dam
Ozarakheda DamAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News:  तापी नदीला आलेल्या पुराचे पाणी हतनूर धरणामधून वाहून जाते. मात्र आता ते पाणी नियोजनानुसार ओझरखेडा धरणात वरणगाव-तळवेल शेती सिंचनासाठी साठविण्यात येणार आहे. तसेच दीपनगर औष्णिक वीज प्रकल्पासाठीही पाणीपुरवठा राखीव करण्यात आला आहे.

तापी नदीला आलेल्या पुराचे लाखो क्युसेस पाणी धरणामधून समुद्रात वाहून जाते. या पाण्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या दृष्टीने मुक्ताईनगर, बोदवड आणि भुसावळच्या सीमावर्ती भागात ओझरखेडा येथे अंदाजे ६०० हेक्टर जमिनीवर साठवण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. या तलावात गेल्या काही वर्षांपासून ३० ते ३५ टक्के पाणीसाठा केला जात आहे.

Ozarakheda Dam
Ujani Dam : उजनी धरणातील पाण्यामुळे कालवे तुडुंब

मात्र यंदा हतनूर ते ओझरखेडा जलवाहिनीवरील काही व्हॉल्व्ह व मोटार दुरूस्तीचे काम युद्धस्थरावर सुरू आहे. त्यामुळे पाणी येण्यास दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागणार आहे. प्रतिवर्षी ओझरखेडा धरणातून ३५ टक्के पाणीसाठा केला जातो.परंतु या वर्षी शासन आदेशानुसार शेती सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा म्हणजे जवळपास ६० टक्केपर्यंत पाणी जमा केले जाणार आहे.

Ozarakheda Dam
Ujani Dam: उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग

जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू

ओझरखेडा धरणनिर्मिती करण्यात आली असून, हजारो एकर शेती ओालिताखाली येणार आहे. त्यासाठी शेती क्षेत्रात देखील जलवाहिनी अंथरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुरुवातीला एक हेक्टरसाठी पाणी दिले जाणार आहे, अशी माहिती पाटबंधारे अभियंता भूषण जेजुरकर यांनी दिली आहे.

‘तापी’चे लाखो क्युसेक पाणी जाते समुद्रात

धरण लाभक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास ‘हतनूर’ भरते. धरणात गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने संपूर्ण पावसाळ्यात अनेकदा धरणामधून पाणी सोडण्यात येते. दहा मध्यम प्रकल्प पूर्ण भरल्यानंतरही अतिरिक्त पाणी वाया जाते. तापी ही जिल्ह्यातील महत्त्वाची नदी, मध्य प्रदेशातली पूर्णा जळगावच्या तापीला येऊन मिळते.

पुढे ती गुजरातमधून प्रवास करत अरबी समुद्रास जाऊन मिळते. ५० वर्षांपूर्वी भुसावळमध्ये हतनूर धरण बांधले गेले. भुसावळ रेल्वे, शहर, दीपनगर वीज प्रकल्प, भुसावळ, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, जळगाव एमआयडीसी या भागांना हतनूरमधून पाणीपुरवठा होतो. नियोजनअभावी वर्षानुवर्षे हे पाणी सोडावे लागते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com