Redevelopment of Railway Stations : भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास

Bhusawal Railway Station : भुसावळ विभागातील १० रेल्वे स्थानकांसह ६८ रोड अंडरपासची पायाभरणी, उद्‌घाटन आणि राष्ट्रार्पण करण्यात आले.
Bhusawal Railway
Bhusawal RailwayAgrowon

Jalgaon News : सावळ विभागातील दहा रेल्वे स्थानकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी नुकतीच केली. भुसावळ विभागातील १० रेल्वे स्थानकांसह ६८ रोड अंडरपासची पायाभरणी, उद्‌घाटन आणि राष्ट्रार्पण करण्यात आले.

भुसावळ विभागातील खंडवा, मूर्तिजापूर, देवळाली, नांदुरा, नांदगाव, पाचोरा, धुळे, लासलगाव, रावेर, सावदा स्थानके या योजनेंतर्गत पुनर्विकासासाठी निश्चित करण्यात आली आहेत. रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी अनेकदा भर दिला आहे.

Bhusawal Railway
Village Development : पाणी, कृषी क्षेत्रामध्ये लोक शिक्षणाची गरज

या प्रयत्नातील एक मोठे पाऊल म्हणून, पंतप्रधानांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी केली आहे. संबंधित स्थानकांसाठी अमृत खर्चासह योजना आणि अंदाज तयार केले आहेत.

रावेरसाठी ९ कोटी २२ लाख, सावदा स्टेशनसाठी ८ कोटी ५१ लाख, पाचोरा २७ कोटी ६७ लाख, मूर्तिजापूरसाठी १२ कोटी ९६ लाख, देवळालीसाठी १० कोटी पाच लाख, नांदुरा १० कोटी ६३ लाख, नांदगाव १० कोटी ६ लाख, धुळ्यासाठी ९ कोटी ४९ लाख, लासलगाव १० कोटी ५ लाख मंजूर करण्यात आले आहेत.

Bhusawal Railway
Group Farming Program : गटशेती कार्यक्रम राज्यभर राबविणार : आमीर खान

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत विविध कामांची अंमलबजावणी गतीशक्ती युनिटकडे सोपविण्यात आली आहे. भुसावळ विभागातील दहा स्थानकांवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार आणि आमदार, स्वातंत्र्यसैनिक, बँक आणि पोस्ट ऑफिसचे अधिकारी आणि शाळकरी मुले, स्वयंसेवी संस्था इत्यादी संबंधित स्थानकांवर कार्यक्रमात सहभागी झाले होते.

संबंधित शहरातील विविध शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com