Nana Patole : लढाई लोकशाही मार्गाने

Struggle through Democratic : लोकशाही म्हणजे "लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य." देशाच्या सरकारवर संपूर्ण जनतेचे नियंत्रण असते. त्यामुळे या व्यवस्थेला 'बहुसंख्यांचे शासन' म्हणूनही ओळखले जाते.
Nana Patole
Nana Patole Agrowon
Published on
Updated on

Political Struggle : शाळेपासूनच नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना शिक्षक विद्यार्थ्यांकडून लोकशाहीचे धडे गिरवून घेतात. लोकशाही म्हणजे "लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य." देशाच्या सरकारवर संपूर्ण जनतेचे नियंत्रण असते. त्यामुळे या व्यवस्थेला 'बहुसंख्यांचे शासन' म्हणूनही ओळखले जाते. भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.

१९४७ साली भारत देश इंग्रज सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि लोकशाही राष्ट्र बनला. आजही आपला देश लोकशाही तत्त्वावरच आधारलेला आहे. 'आपला देश प्रगतीच्या मार्गावर चालावा, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास व्हावा,' यासाठी देशातील अनेक मोठमोठ्या मंडळींनी वर्षानुवर्षे उत्तम कामगिरी करत विकसित भारताच्या परंपरेच्या विचारधारेचे बीज रोवले आणि त्याचे रूपांतर समृद्ध वटवृक्षात झालेले आपल्याला दिसून येते.

Nana Patole
Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

लोकशाही व्यवस्थेत सर्व जाती-धर्म-वर्ग एकसमान आहेत आणि याच लोकशाहीच्या समानतेच्या विचारावर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले चालताना दिसतात. पण याच आपल्या देशात मागील काही वर्षांपासून अन्याय होतो आहे. विविध जाती-धर्म-वर्गात द्वेष पसरवला जात आहे, विषमतेचा विषवृक्षही वेगाने फोफावू लागला आहे. या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी आणि पुन्हा एकदा सर्व जाती-धर्म-वर्गातील लोकांना एकत्र आणण्याचे काम काँग्रेस पक्ष आणि नाना पटोले करत आहेत.

नाना पटोले हे सर्वसामान्य कुटुंबातले. त्यांना कोणताही राजकीय वारसा नाही तरी ते सर्वसामान्यांचं मन व त्यांच्यावर होत असलेला अन्याय जवळून जाणतात. सामान्य लोकांना लोकशाही पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी ते राजकारणात आले. सत्ताधीशांकडून जनतेचा आवाज दाबला जातोय. हाच आवाज सत्तेतील सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नाना कायम प्रयत्नशील असतात. कोणत्याही अन्यायविरोधात जनतेचं मत मांडताना जीवाची, स्वतःच्या पदाची पर्वा करत नाहीत. बेधडकपणे प्रत्येक स्थितीत सामोरे जाऊन त्यांना आव्हान देतात व जनतेचे हक्क मिळवून देतात. नाना पटोलेंना समाजकार्याची खूप आवड. त्यामुळे कोणताही प्रांत असो लोकांनी हाक मारली की, नाना मदतीसाठी सदैव हजर. गावातील लोक म्हणतात, आमच्या भाऊंचं कसं आहे माहीत आहे का? "एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह!" असं नाना पटोलेंचं जनतेशी अगदी जिव्हाळ्याचं नातं आहे.

Nana Patole
Nana Patole : लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा, नाना पटोले आणि राहुल गांधींची भेट

गावात कोणावरही झालेला अन्याय त्यांना सहन होत नाही. त्याविरोधी लढा देण्यास आणि गरज पडल्यास विद्रोही भूमिका घेऊन सज्ज असतात. कुणाचीही भीती न बाळगता गोरगरीब जनतेच्या हितासाठी ते कायम आघाडीवर असतात, मग त्यासाठी पद आणि प्रतिष्ठेवर पाणी फेरण्यासही ते तयार असतात. धानउत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून अगदी आमदार पदाचा राजीनामा दिलेल्या नाना पटोलेंचं हे आक्रमक रूप अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे.

नाना पटोले राजकारणात आले तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना बोनस मिळवून दिला व धान्य साठवणीसाठी गोदाम बांधून दिले. त्यामुळे विदर्भातील शेतकाऱ्यांचे हित चिंतणारा, त्यांच्यासाठी लढणारा, त्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडणारा त्यांचा नेता त्यांना मिळाला. आदिवासी आणि शेतकऱ्यांना हक्काच्या जमिनी मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांसोबत रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे त्यांना अटक करण्यात आली होते. बैलपोळ्याचा तो दिवस होता. त्या दिवसापासून नागपूर कारागृहात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर उपोषण करण्याची आग्रही भूमिका घेतली आणि यात त्यांच्या साथीदारांनीही त्यांना पाठिंबा दिला. शेवटी या आंदोलनामुळे वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस न्यायालयाच्या अंतिम आदेशास स्थगिती दिली गेली व आदिवासी व भूमीहीन शेतमजूर यांच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्न मार्गी लागला.

त्यांनी अनेक जातीजमातींना शासनाच्या योजनेचा फायदा व्हावा, त्यांना योग्य शिक्षणसोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अनेक विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग यांचा समावेश ओ. बी सी. प्रवर्गात करून घेण्यासाठी प्रयत्न केले व त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. "काँग्रेस पक्ष कधीच हुकूमशाहीला पाठिंबा देत नाही आणि तसं होणार असेल त्याविरोधात काँग्रेस पक्ष संविधानिक आदर ठेवून लढा देईल." या काँग्रेसच्या विचारांनी नाना पटोले प्रेरित आहेत आणि अजूनही त्यांचा लोकांसाठी लोकशाही मार्गाने लढा सुरूच आहे. नाना म्हणतात, "अन्यायाविरूद्ध लढा देण्यास मी शेवटच्या श्वासापर्यंत तयार असेन." "देशाला पुन्हा एकदा गुलामगिरीच्या दरीत टाकायचं नाही म्हणून लोकशाही टिकणं अत्यंत गरजेचं आहे," असं काँग्रेसचं मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com