Onion Auction : शेतकऱ्याने उघड केला बेकायदा कपातीचा प्रकार

Nashik APMC : नाशिक जिल्ह्यात काही बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव झाल्यानंतर हिशोबपट्टीतून रोख स्वरूपात हमाली, तोलाई व वाराई कपात केली जात आहे.
Onion Market
Onion Market Agrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्ह्यात काही बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव झाल्यानंतर हिशोबपट्टीतून रोख स्वरूपात हमाली, तोलाई व वाराई कपात केली जात आहे. मात्र त्याचा स्पष्ट उल्लेख पावतीवर नसतो. या मुद्द्यावर शेतकरी किरण मोरे यांनी आवाज उठवला. तर प्रहार संघटनेने सटाणा पोलिसात बेकायदेशीर कपातीबाबत तक्रार दिली. यावर बाजार समितीने आता सटाणा पोलिसात या दोघांविरुद्ध पत्र दिले आहे. संबंधित राजकीय पोळी भाजण्यासाठी व व्यापाऱ्यांना नाहक बदनाम करत असल्याचे नमूद केले आहे.

उमराणे बाजार समितीने आता संबंधितांविरुद्ध सटाणा पोलिसात पत्र दिले आहे. लेव्हीच्या मुद्द्यावर बाजार समिती बंद झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी हिशेबपट्टीमधून हमाल व तोलाईची रक्कम कपात करणार नाही, असे लेखी पत्र बाजार समितीला दिलेले आहे. त्यामुळे लिलाव ठप्प होते. तर लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता असल्याने यावर तोडगा निघाला नव्हता. हमाल/मापारी, व्यापारी असोसिएशन व संचालक मंडळाच्या संयुक्त बैठकीत झाली.

Onion Market
Onion Subsidy : येवल्यातील १७०० शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित

त्या वेळी व्यापाऱ्यांनी हिशोबपट्टीत हमाली व तोलाईची रक्कम रोख स्वरूपात कापली जात आहे. यासंबंधी बाजार समितीच्या स्थानिक पातळीवर निर्णय झाला होता. तसा अहवालही बाजार समितीने वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केलेला आहे. त्यामुळे हा प्रकार चुकीचा नसल्याचे बाजार समितीचे म्हणणे आहे, असे असताना काही घटक बाजार समितीची बदनामी करत असल्याची तक्रारी होत असल्याचे बाजार समिती व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

तर शेतकऱ्याच्या हिशेबपट्टीतून कुठलेही कारण न देता कपात झाल्याने यापूर्वी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. या पत्रामुळे व्यापारी असोसिएशनने लिलावात सहभागी न होण्याबाबत पवित्रा घेतला होता. तर लिलाव सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. या वेळी व्यापारी व शेतकरी यांच्या शाब्दिक चकमक झाली होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो त्यामुळे बाजार समितीविरुद्ध पत्र देणाऱ्यांना समज देण्यात यावी, अशी मागणी बाजार समितीने केली आहे.

Onion Market
Rangada Onion: खरीप व रांगडा हंगामासाठी उपयुक्त वाण
लेव्हीच्या मुद्द्यावर बाजार समिती बंद असताना लिलाव सुरू करण्यासाठी तोडगा काढून हमाली, मापाई मजुरी रोख स्वरूपात कापण्याचा हा निर्णय बाजार समितीने घेतलेला आहे. गेली दीड महिने बाजार समिती अत्यंत सुरळीत चालू आहे. यात बाजार समितीकडून शेतकरी व समितीच्या इतर घटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता बाजार समितीने घेतलेली आहे.
प्रशांत विश्‍वासराव देवरे, सभापती, बाजार समिती, उमराणे
जी रक्कम कपात केली जाते, कायद्यानुसार कपातीचे कारण किशोर पाटील यांनी नमूद केले पाहिजे. माझे ३२६ रूपये कपात झाले. त्याचा कायदेशीर उल्लेख पावतीवर हवा. तसे नसल्याने ही बेकायदेशीर कपात आहे.
किरण मोरे, शेतकरी व तक्रारदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com