Rangada Onion: खरीप व रांगडा हंगामासाठी उपयुक्त वाण

Onion Seeds: कांद्याचा भीमा सुपर हा वाण खरीप हंगामामध्ये लागवडीनंतर १०० ते १०५ दिवसांत तसच रांगडा हंगामामध्ये लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत काढणीस येतो.

Kharip Onion Variety: लाल कांद्यामध्ये भीमा शक्ती हा कांद्याचा वाण खरीप आणि रांगडा अशा दोन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे. हा वाण लागवडीनंतर १२५ ते १३० दिवसांत काढणीस येतो. या वाणापासून सरासरी हेक्टरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळते.या वाणाच्या कांद्याची साठवणक्षमता ५ ते ६ महिने असते. हे वाण फुलकिडे आणि बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे. पांढऱ्या कांद्यामध्ये भीमा सफेद हा वाण चांगला आहे. हा वाण लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत काढणीस येतो. या वाणापासून हेक्टरी सरासरी १८ ते २० टन उत्पादन मिळते. या वाणाचे कांदे खरीप हंगामात साठवणुकीत १ ते दीड महिन्यापर्यंत टिकतात. हा वाण प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त आहे. तर फुलकिड्यांसाठी हा वाण काही प्रमाणात सहनशील आहे. या शिवाय पांढऱ्या कांद्याचा भीमा शुभ्रा हा वाण देखील खरीप हंगामासाठी चांगला आहे. या पैकी कांदा वाणांची निवड करुन खरीप हंगामातही योग्य नियंजन करुन कांद्याच चांगल उत्पादन मिळू शकतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com