Swapnil Shinde
यंदा मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी खालावली आहे.
त्यामुळे उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समुहातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला.
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून त्याला विरोध होऊ लागला अखेर न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी इतके पाणी सोडण्यात आले.
मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी दारणा प्रकल्पातून सोमवारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
हे पाणी जायकवाडी धरणात मंगळवारपासून दाखल होण्यास सुरुवात झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
गुरुवारी सकाळीपर्यंत २० हजार ६०० क्यूसेकने पाण्याची आवक सुरू असून जायकवाडी सध्या ४३.६७ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे.