Fisherman Conflict : स्‍थानिक-परप्रांतीय मच्छीमारांमधील संघर्ष टोकाला

Fisherman Conflict Update : पारंपरिक मासेमारी आणि सागरी संपत्तीची लूटमार करणाऱ्या परप्रांतीय एलईडी, पर्ससीन मच्छीमारांमधील संघर्षही टोकाला पोचला आहे.
Fisherman
FishermanAgrowon

Alibaug News : एलईडीद्वारे मासेमारीचे प्रमाण रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक मासेमारी आणि सागरी संपत्तीची लूटमार करणाऱ्या परप्रांतीय एलईडी, पर्ससीन मच्छीमारांमधील संघर्षही टोकाला पोचला आहे. वारंवार तक्रारी करूनही बेकायदा मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने पारंपरिक मच्छीमारांमधून संताप व्यक्त होत आहे.

बंदी असतानाही एलईडी-पर्ससीन नेट मासेमारी जोमात सुरू असल्याने पारंपरिक मच्छीमारांच्या हाती फारसे काही लागत नाही. त्‍यामुळे त्‍यांच्या आर्थिक उत्‍पन्नावर परिणाम झाला आहे. खोल समुद्रात जाऊन मासळी मिळत नसल्‍याने डिझेल, रसद आदी खर्चही निघत नसल्‍याचे मच्छीमार सांगतात. याचाच परिणाम म्हणून तालुक्यातील रेवस आणि बोडणी येथील मच्छीमारांनी आपल्या ३०० मासेमारी बोटी महिनाभरापासून किनाऱ्यावरच नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Fisherman
Horticulture Promotion : अकोला जिल्ह्यात फलोत्पादनाला प्रोत्साहन

करंजा बंदरातून सुरू झालेली बेकायदा मासेमारी आता दिघी, आगरदंडा, जीवना बंदरापर्यंत पोचली आहे. यात जिल्ह्यातील पारंपरिक मच्‍छीमार भरडला जात आहे. बेकायदा मासेमारी करणाऱ्यांच्या दादागिरीला वैतागून काही पारंपरिक मच्छीमार आपला व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहेत.

एलईडी मासेमारीत भांडवलदारांचा सहभाग

७०० कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असणार्‍या रेवस, बोडणी परिसरात सुमारे ३०० बोटी आहेत. मात्र बंदी असतानाही पर्ससीन नेट आणि एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींद्वारे मुंबई ते रत्नागिरी परिसरातील समुद्रात १२ नॉटीकल अंतराच्या आत आणि बाहेरही बेसुमार मासेमारी सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पैसा मिळत असल्याने आता यात बडे भांडवलदारही उतरले आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार आणि भांडवलदारांचे पाठबळ असणारे परप्रांतीय मच्छीमारांतील वाद विकोपाला जाऊ लागला आहे.

Fisherman
Jansanvad Yatra : उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा शुक्रवारपासून धाराशिव जिल्ह्यात
एलईडी मासेमारीला बंदी आहे. तरीसुद्धा काही मंडळी बेकायदा मासेमारी करतात. एलईडी मासेमारीमुळे समुद्रातील मासळी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे सरकार व प्रशासनाने यावर कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. कायद्यातील कच्चे दुवे शोधून खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घातले जात असल्‍याने खंत वाटते.
विजय गिदी, संचालक, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ
बेकायदा मासेमारीमुळे सागरी जैवविविधतेचा समतोल बिघडत आहे, त्यामुळे काही प्रजाती नष्ट झाल्या असून सरकारने एलईडी मासेमारीवर बंदी घातली आहे. अशा पद्धतीने जे मासेमारी करताना सापडतील, त्यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. दंडही आकारण्यात आला आहे. पारंपरिक मासेमारी करण्यासाठी प्रबोधनही केले जात आहे.
संजय पाटील, सहायक आयुक्त, मत्स्य विभाग, रायगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com