Horticulture Promotion : अकोला जिल्ह्यात फलोत्पादनाला प्रोत्साहन

Shankar Kirave : अकोला जिल्ह्यात फलोत्पादनाचे क्षेत्र वाढण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद सुरू केला आहे.
Horticulture
HorticultureAgrowon

Akola News : पारंपरिक पिकांकडून शेतकऱ्यांनी फलोत्पादनाकडे वळणे काळाची गरज बनली आहे. शासनही विविध योजनांच्या माध्यमातून यासाठी प्रोत्साहन, अनुदान देते. जिल्ह्यात फलोत्पादनाचे क्षेत्र वाढण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद सुरू केला आहे. त्यांनी तेल्हारा तालुक्यातील गावांमध्ये भेटी देऊन फलोत्पाक शेतकऱ्यांशी संवाद साधला.

सोमवारी (ता. १२) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांच्यासह कृषी उपसंचालक विलास वाशिमकर यांनी तेल्हारा तालुक्यांमध्ये प्रक्षेत्र भेटी देत पाहणी केली. दहिगाव येथील शेडनेटमध्ये झेंडू बीजोत्पादन घेतले जात आहे.

Horticulture
Sugar Rate : मोदी सरकारच्या धोरणामुळे साखर कारखानदारीसह शेतकऱ्यांमध्ये कडवटपणा

या शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. हिंगणी बुद्रुक येथील सामूहिक शेततळे व संत्रा बाग त्याचप्रमाणे मनरेगाअंतर्गत केळीलागवड, मल्चिंगवरील टरबूज शेतीची पाहणी केली. दानापूर शिवारात गोपाल येऊन यांनी सलग ३० एकरावर टोमॅटोचा प्लॉट, क्रॉप कव्हरमध्ये असलेली मिरची लागवडीच्या प्रक्षेत्राला भेट दिली.

Horticulture
Colleges of Nursing : राज्यात होणार सहा नवीन नर्सिंग महाविद्यालये; लातूर, बारामती, सांगलीसह या तीन जिल्ह्यांच्या समावेश

हिवरखेड येथील पानपिंपरी मळ्याला भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. खंडाळा येथे भाऊसाहेब फुंडकर व मनरेगाअंतर्गत लावलेल्या फळबागेची पाहणी करीत संत्रा फळांचा दर्जा उत्कृष्ट कसा येईल याबाबत सूचना केल्या. या वेळी तेल्हारा तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

पारंपरिक पिकांपेक्षा फलोत्‍पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्‍चित वाढू शकते. जिल्ह्यात हवामान, जमीन, पाणी उपलब्ध असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com