Jansanvad Yatra : उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा शुक्रवारपासून धाराशिव जिल्ह्यात

Uddhav Thackeray Jansanvad Yatra : माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा शुक्रवारी व शनिवारी (ता. १६ व १७) रोजी धाराशिव लोकसभा मतदारसंघात येत आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayAgrowon

Dharashiv News : माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा शुक्रवारी व शनिवारी (ता. १६ व १७) रोजी धाराशिव लोकसभा मतदारसंघात येत आहे. मतदारसंघात पाच ठिकाणी जाहीर सभेतून जनतेशी ते संवाद साधणार आहेत.

औसा (जि. लातूर), उमरगा, तुळजापूर, कळंब व भूम (सर्व जि. धाराशिव) येथे सभा होणार आहेत असे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी कळविले आहे.

Uddhav Thackeray
Sand Policy : आता वाळू मिळणार ऑनलाइन

शुक्रवारी (ता. १६) खासगी विमानाने लातूर विमानतळावर दुपारी १२ वाजता त्यांचे आगमन होणार आहे. साडेबारा वाजता औसा येथील विजय मंगल कार्यालयात सभा होणार आहे. दुपारी तीन वाजता उमरगा येथील गुंजोटी कॉर्नर येथील दत्तमंदिरासमोर सभा होणार आहे.

Uddhav Thackeray
PDKV Convocation : वातावरण बदलाचे संकट हे संधी माना ः राज्यपाल बैस

संध्याकाळी सात वाजता तुळजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांची सभा आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता कळंब येथील होळकर चौकात सभा होणार आहे. दुपारी पाच वाजता भूम येथील नगर पालिकेसमोर ओंकार चौकात सभा होणार आहे.

यानंतर ते येरमाळा, बार्शी बायपासमार्गे परांड्याकडे निघणार आहेत. परंडा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत होईल. सोनारी येथील भैरवनाथचे दर्शन घेणार आहेत. अनाळा, वालवड मार्गे भूमकडे निघतील व भूम येथे पाच वाजता ओंकारचौकात सभा होईल. सभेनंतर भुमहून छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे रवाना होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com