Rain Update : रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला; मासेमारी सुरू

Latest Rain News : सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (ता. २) ओसरला. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (ता. २) ओसरला. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पावसाचा जोर कायम राहिला तर पसवणाऱ्या भात रोपांमध्ये दाणेच भरणार नाहीत आणि उत्पादनावर परिणाम होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. वारे कमी झाल्यामुळे मासेमारीला सुरुवात झाली आहे.

रविवारी दिवस-रात्र पाऊस कोसळत होता. खेडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर रात्रीपर्यंत पाणी साचून राहिल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. दापोली तालुक्यातील केळशी गावातील लोकांच्या घरात पाणी शिरले होते. रात्री पाऊस कमी झाल्यानंतर लोकांनी पाणी बाहेर काढले. निवळी-बावनदी येथे कोसळलेली दरड दुपारनंतर बाजूला करण्यात आली.

Rain Update
Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस, वाऱ्याचा जोर वाढला

त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. वाऱ्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात वृक्ष पडल्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या आणि वीजपुरवठा खंडित झाला. जांभूळ आड येथील अशोक चंदुरकर व यशवंत चंदुरकर यांच्या घरावर झाड कोसळले आहे. यामध्ये त्यांच्या घराचे नुकसान झाले. देवरूख-संगमेश्वर मार्गावर लोवले येथे नदीचे पाणी रस्त्यावर आले होते.

Rain Update
Maharashtra Rain Update : राज्यात पाऊस उघडीप देणार

सोमवारी पावसाचा जोर ओसरल्यानंतर जिल्ह्यातील विस्कळीत झालेले जनजीवन पुर्वपदावर आले. पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. सतत पाऊस पडत राहिला तर भातशेतीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संगमेश्‍वर तालुक्यातील राजवाडी येथील शेतकरी संतोष भडवळकर म्हणाले, की यंदा पाऊस अनियमित असला तरीही शेवटच्या टप्प्यात भात रोपांना आवश्यक अशावेळी पाऊस सुरू झाला; मात्र पावसाचा जोर आता कमी होणे आवश्यक आहे. १३० ते १३५ दिवसांनी भात उत्पादन मिळणारी रोपे आता पसवण्यास सुरुवात होतील. या वेळी पाऊस झाला तर त्या रोपांमध्ये दाणे होणार नाहीत. त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com