Ajit Pawar : मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता, कामाला लागा

Election Update : येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,’’ असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. ७) कार्यकर्त्यांना दिला.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : ‘‘येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,’’ असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. ७) कार्यकर्त्यांना दिला. कल्याण ग्रामीण भागातील वरप येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मेळाव्यात ते बोलत होते.

पवार म्हणाले, ‘‘फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारावर आमची वाटचाल सुरू आहे. यंत्रणा हलवण्याची ताकद सत्तेत असायला हवी. त्यादृष्टीने आमचे काम सुरू आहे. सार्वजनिक कामे झालीच पाहिजेत. सर्वसामान्य लोकांचे कल्याण या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे. आमच्यावर जे लोक टीका करत आहेत, त्याला मी महत्त्व देत नाही तर मी कामाला महत्त्व देतो. आमचे व्हिजन क्लीअर आहे. राज्यातील जनतेचा विकास हेच ध्येय घेऊन आम्ही काम करत आहोत.’’

Ajit Pawar
Ajit Pawar : पुणेकरांची चिंता वाढली? अजित पवार यांनी दिले पाण्यावरून संकेत?

‘‘या देशाची मान आणि शान वाढविण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली झाले आहे. भारत देश प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करत आहे. ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले जात आहे. घरकुल योजना राबवली जात आहे. काहींना नोकरी व काहींना व्यवसाय दिला जात आहे. शेतकऱ्यांना सहा हजार केंद्रे व राज्य सरकार सहा हजार असे १२ हजार रुपये देत आहोत,’’ असेही पवार म्हणाले.

Ajit Pawar
Co-Operative Election Update : जिल्ह्यातील ११६० सहकारी संस्थांच्या लवकरच निवडणुका

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींनी विचार मांडले. या वेळी अनेक पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

‘काही जण थांबायला तयार नाहीत’

‘‘वय झाल्यावर राजकारणात आणि इतर क्षेत्रांत थांबायचे असते, असा संकेत असतो. परंतु काही जण थांबायला तयार नाहीत. काही जण हट्टीपणा करत आहेत. आम्ही आहोत ना सक्षम, आम्हाला मार्गदर्शन करा ना, मी कित्येक वर्षे सत्तेत काम करत आलो आहे,’’ असे म्हणत त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com