Ajit Pawar : पुणेकरांची चिंता वाढली? अजित पवार यांनी दिले पाण्यावरून संकेत?

Water Issue: राज्याच्या अनेक भागात सध्या दुष्काळ स्थिती पहायला मिळत आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाण्यावरून भाष्य केले आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात देखील पाणी संकंट पहायला मिळत आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला पुण्याच्या पाण्यावरून सोमवारी (२५ रोजी) सुचना केल्या आहेत. अजित पवार यांनी, 'पुण्यातील नागरीकांना पिण्यासाठी पाणी पुरेल अशी व्यवस्था करताना शिल्लक राहिलेले पाणी शेतीसाठी वापरा', असे निर्देश दिले आहेत.

अजित पवार यांनी, 'जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत पुणेकरांना पाणी पुरेल असे नियोजन करा, असे निर्देश जलसंपदा विभागाचे दिपक कपूर आणि त्यांच्या टीमला केल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी, पुण्यातील पाण्याची स्थिती ही मागील वर्षापेक्षा बिकट झाल्याचेही सांगताना मार्च अखेर यावर पुन्हा एकदा चर्चा केली जाईल असेही ते म्हणाले.

Ajit Pawar
Ajit Pawar : शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी अमित शहा यांची भेट घेणार : अजित पवार

केंद्राच्या धरतील सवलती

मधल्या काळात झालेल्या गारपिट आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्याने केंद्राकडे २५०० हजार कोटी मागितले होते. तर राज्यातील दुष्काळग्रस्त १२०० मंडलांना केंद्राच्या धरतील सवलती देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

सर्व्हेंना काहीच आधार नाही

राज्यातील लोकसभेच्या निवडणूकांवरून वातावरण तापत असतनाच समोर आलेल्या सर्व्हेवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, 'अशा सर्व्हेंना काहीच आधार नसल्याचे म्हटले आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे सर्व्हे पाहा आणि निकालही पाहा', असा टोला त्यांनी लगावला आहे. तर 'आम्ही तिघे एकत्र आहोत त्याची आम्ही काळजी घेऊ', असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar
NCP Conclave : अजित पवार गटाची पुढील रणनीती काय? कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर

पद यात्रा संघर्ष यात्रेवरून टोला

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दोन खासदारांकडून मोर्चे आणि रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावरून अजित पवार यांनी टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी, खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता टीका केली आहे. तसेच कोल्हे यांनी जर पाच वर्षात मतदार संघात लक्ष घातले असते तर ही वेळ आली नसती असे ते म्हणाले.

तसेच कोल्हे यांना निवडूण आणण्यासाठी दिलीप वळसे पाटील आणि आपण हाडाची काडं केल्याचे ते म्हणाले. तसेच कोल्हे दीड वर्षांपुर्वी राजीनामा देण्यास निघाले होते. त्यावेळी त्यांनी सिनेमाचे कारण दिले होते. पण आता निवडणूका जवळ आल्यानेच यांना उत्साह आला आहे. म्हणून पदयात्रा, संघर्ष यात्रा निघत आहेत. यावेळी केल्हे यांना इशारा देताना, 'काढा पद यात्रा वैगेरे, मी ही सांगतो मतदारांना, कोल्हे यांची भूमिका कशी होती' असे अजित पवार म्हणालेत.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com