Co-Operative Election Update : जिल्ह्यातील ११६० सहकारी संस्थांच्या लवकरच निवडणुका

Election Update : सोलापूर जिल्ह्यातील संचालक मंडळाची मुदत संपणाऱ्या जवळपास ११६० सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी अर्हता दिनाकांची मागणी जिल्हा उपनिबंधक कार्यालायच्यावतीने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे कऱण्यात आली आहे.
Election
ElectionAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील संचालक मंडळाची मुदत संपणाऱ्या जवळपास ११६० सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी अर्हता दिनाकांची मागणी जिल्हा उपनिबंधक कार्यालायच्यावतीने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे कऱण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या संस्थांच्या मुदत संपणाऱ्या तारखांची पडताळणी करुन निवडणूक घेण्यात येणार आहे.

Election
Women Spinning Mill Election : सांगोल्याच्या महिला शेतकरी सूतगिरणी निवडणुकीत ४८ अर्ज

जिल्ह्यातील ११६० सहकारी संस्थांमध्ये ब वर्गातील १०९, क वर्गातील ४१० आणि ड वर्गातील ६४१ सहकारी संस्थांचा समावेश आहे. ब वर्गामध्ये समावेश असलेल्या संस्थांमध्ये दि सोलापूर सोशल अर्बन बँक, विद्यानंद अर्बन बँक, कमला को-अॉपरेटिव्ह बँक, समर्थ सहकारी बँक, वैनगंगा- कृष्णा ग्रामीण बँक कर्मचारी पतसंस्था, महापालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्था,

Election
Shetkari Sangh Election : शेतकरी संघाच्या निवडणुकीसाठी ७८ अर्ज, संघ वाचवण्यासाठी उमेदवारीची अनेकांची मागणी

युनियन बँक कर्मचारी सहकारी पतसंस्था, सोलापूर जिल्हा परिषद अभियंता सेवकांची सहकारी पतसंस्था, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था-दोन आदी प्रमुख संस्थांचा समावेश आहे. जिल्हा उपनिबंधकांनी मागवलेल्या माहितीनुसार लवकरच या संस्थांच्या तारखांची पडताळणी करून त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

माळशिरसमधील सर्वाधिक संस्था

जिल्ह्यातील ११६० एकूण संस्थांपैकी उत्तर सोलापूर तालुक्यातील १४, अक्कलकोटमधील २६, माळशिरसमधील १९४, करमाळ्यातील ७७, माढ्यातील ९३, सांगोल्यातील ३७, दक्षिण सोलापुरातील ७१, मंगळवेढ्यातील ५३, सोलापूर शहर- ३८३, पंढरपुरातील ८३, मोहोळ तालुक्यातील ८१ आणि बार्शी तालुक्यातील ४८ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये सोलापूर शहरासह माळशिरस आणि माढ्यातील संस्थांचा सर्वाधिक समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com