Agriculture Laws Issue : भाजपने तीन काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आखले – नाना पटोले

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या अन्यायी कायद्यांविरोधात मोठे जन आंदोलन उभे केले. जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याला खरा न्याय मिळणार नाही, अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली.
Nana Patole
Nana PatoleAgrowon
Published on
Updated on

The Politics of Agriculture : बहुमताच्या जोरावर अनेक चांगले निर्णय घेता येतात. मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने त्यांना मिळालेल्या बहुमताचा वापर चांगल्या निर्णयासाठी न घेता ज्यांच्या जोरावर बहुमत मिळाले त्यांना उदध्वस्त करण्यासाठी केला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तीन काळे कृषी कायदे होय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या अन्यायी कायद्यांविरोधात मोठे जन आंदोलन उभे केले. जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याला खरा न्याय मिळणार नाही, अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली.

सत्तेत येण्याआधी शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करणारे भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी सत्ता मिळाल्यानंतर पटली मारली. शेतकरीविरोधी तीन काळे कायदे आणून त्यांच्यावर अन्याय केले. या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारने आंदोलनजीवी, खलिस्तानी, नक्षलवादी अगदी अतिरेकी म्हणून त्यांचा अपमान केल्याचे नाना पटोले म्हणाले. एका बाजूला शेतकरी पोशिंदा असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे कायदे करून त्याला संपवण्याचे षडयंत्र आखायचे, हेच धोरण भाजपने राबवले. शेतकरीविरोधी कायदा करून सरकारने एक प्रकारे देशातील शेतकऱ्यांना बरबाद करण्याचे काम केले आणि म्हणून हजारोंच्या संख्याने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आले आणि एक प्रकारे उठाव केला. पिकांचा उत्पादनाचा खर्च आणि नफा याचा योग्य हिशोब करून धोरण राबवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे नाना पटोले म्हणाले.

Nana Patole
Nana Patole : लढाई लोकशाही मार्गाने

कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नाना पटोले यांनी फक्त पाठिंबाच दिला नाही तर लाक्षणिक उपोषणही केले. नाना पटोलेंनी ९ डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कृषी कायदे मागे घेण्याची विनंती केली. 'मैं भी किसान हूँ' या शीर्षकाच्या पत्रात नानांनी शेतकऱ्यांचे आंदोलन किती तीव्र आहे याची कल्पना पंतप्रधानांना करून दिली होती. मी संविधानिक पदावर असलो तरी सर्वात आधी मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांविरोधात आणलेल्या काळ्या कायद्यांना विरोध करणे आणि त्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देणे हे माझे कर्तव्य असल्याचे सांगत नाना पटोले यांनी या आंदोलनात उडी घेतली होती. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या या कायद्याची नाना पटोले यांनी जळगावमध्ये दहन आंदोलनासह मेळाव्याचे आयोजन केले. इंग्रजांविरूद्ध स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन सुरू असताना जळगावच्या फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. आता हे सरकार इंग्रजांप्रमाणे अत्याचारी असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता.

Nana Patole
Nana Patole : जनसामान्यांचा आवाज- नाना पटोले

मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी वर्षभर लढले. या संघर्षात ७०० शेतकऱ्यांचा बळी गेल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने प्रचंड अत्याचार केले, त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले. मात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्यासमोर मोदींना कायदे रद्द करण्यास भाग पडले. शेतकऱ्यांच्या या लढ्याला नाना पटोले यांनी पाठिंबा दिला आणि सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले.

भाजपने तीन काळे कायदे मागे घेतले असले तरी शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप कायम आहेत. एमएसपी कायदा, स्वस्त वीज, आंदोलनादरम्यान मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना एक कोटी या मागण्यांकडे सरकारचे अद्याप लक्ष नाही. लोकशाहीत पंतप्रधांनी स्वत: शेतकऱ्यांना बोलावून त्यांना हवा तसा शेतकरी हिताचा कायदा मंजूर केला पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी करत शेतकऱ्यांसाठीचा लढा कायम ठेवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com