Team Agrowon
परवा गावी गेलेलो. विहिरीतील मोटरची वायर तुटलेली. वडील म्हणाले वायरमन बोलावून आन. वायरमनचे नाव झेंडे.
वडील म्हणाले, झेंड्या काय म्हणतोय बघ. झेंड्या ला फोन केला तो काय उचलेनाच. मग मी आणि प्रशांत झेंड्याच्या घरी गेलो.
झेंड्या जेवत होता. म्हणाला,चला जाऊयात. मग झेंड्या घेऊन आलो. त्याने इकडे तिकडे जोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाऱ्याने झाडाची फांदी थटून वायर तुटली होती.
झेंडे म्हणाला, आधी हे झाडाची फांदी तोडली पाहीजे. मग तिकडून राज्या आला. राज्याची बायको त्याला सोडून गेलेली आहे. तो अधून मधून पुण्याला तिच्याकडे चक्कर टाकतो.
आणि त्यानंतरचे काही दिवस प्रचंड उदास असतो.तर राज्या आला. वडील म्हणाले, राज्या तुझ्याकडची कुर्हाड आण. राज्या मागारी जाऊन कुर्हाड घेऊन आला.
तेवढ्यात बामन काका, भैया कांबळे,रमण शेठ हे झाडाखालचा रमीचा डाव बंद करून आमच्याकडे आले. राज्या जाडा असल्यामुळे त्याला लिंबावर चढताच येईना. झाडाला येलतार खूप. येलतार म्हणजे, झाडावर वेल खूप. त्यामुळे गचपान तयार होते.