Sustainable Home: शाश्वत अन् स्मार्ट शेतकऱ्यांची घरे

Rural Homes: भविष्यातील शेतकऱ्यांची घरे ही केवळ निवारा न राहता, ती स्मार्ट, शाश्वत आणि बहुपर्यायी गरजांशी जुळवून घेणारी असतील. ही घरे स्थानिक हवामानाशी जुळवून घेणारी, पर्यावरणस्नेही साहित्याने बांधलेली असतील.
Sustainable Home
Sustainable HomeAgrowon
Published on
Updated on

Smart Technology in Home : भारताची अर्थव्यवस्था अनेक दशकांपासून शेतीवर आधारलेली आहे. आजही भारतातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. मात्र, शेतकऱ्यांचे जीवन आणि त्यांची घरे आजही बऱ्याच प्रमाणात पारंपरिक पद्धतीनेच राहिली आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणीय बदल आणि ग्रामीण विकासाच्या नव्या कल्पनांमुळे आता शेतकऱ्यांची घरेही झपाट्याने बदलणार आहेत.

ही घरे स्थानिक हवामानाशी जुळवून घेणारी, पर्यावरणस्नेही साहित्याने बांधलेली असतील. स्थानिक माती, बांबू, किंवा कॉम्प्रेस्ड मड ब्लॉक्ससारख्या साहित्यातून उभारलेल्या घरांमध्ये उष्णता नियंत्रण, पाण्याची बचत आणि नैसर्गिक हवामान नियंत्रण असेल. घरांवर ग्रीन रूफ, उभ्या बागा असतील, ज्या केवळ सौंदर्यवृद्धी करत नाहीत तर स्वयंपाकासाठी लागणारी भाजीपाला पुरवतील.

पर्जन्य, जलसंधारण आणि जैवगॅस संयंत्रे घरातच बसवलेली असतील, ज्यामुळे स्वयंपाकासाठी इंधन आणि पाण्याची गरज स्थानिक पातळीवर पूर्ण होईल. शेतकऱ्यांना शेणखत, कचरा, पालापाचोळा या सर्वांचे महत्त्व अधिक चांगल्या तऱ्हेने कळेल व त्याचा उपयोग एक शाश्वत जीवनशैली निर्माण करण्यासाठी केला जाईल. याची प्रचिती आता ग्रामीण भागामध्ये उभारल्या जात असलेल्या आधुनिक बायोगॅस, सोलर पंप, सोलर लाईट, लाकडावर पाणी गरम करण्यासाठी वापरला जाणारा आधुनिक बॉयलर, अशा स्वरूपात दिसू लागली आहे.

Sustainable Home
Corporate Farming : शेतीला व्यावसायिक स्वरूप देणे गरजेचे : शेखर गायकवाड

शाश्वत जीवनशैली

ऊर्जेच्या बाबतीत भविष्यातील शेतकरी घरे स्वावलंबी असतील. घरांवर सौर पॅनेल्स बसवले जातील, जे घरगुती वापर, मोटारी, पंप, आणि इतर उपकरणांना वीज पुरवतील. एलईडी दिवे, ऊर्जा बचत करणारी उपकरणे, आणि बॅटरी संच साठवण प्रणाली वापरून ही घरे कमी खर्चात आणि जास्त कार्यक्षम बनतील. यामुळे वीज पुरवठ्याच्या अनिश्चिततेवर मात करता येईल. त्यामधून कमी कष्टामध्ये व कमी खर्चामध्ये शाश्वत जीवनशैलीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी करण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न असेल.

घरात आयओटी डिव्हाइसेस असतील जे जमिनीतील ओलावा, हवामानाचा अंदाज, बाजार भाव इत्यादी माहिती देऊ शकतील. कोणत्या हंगामात विजेचा कमीत कमी वापर करून काय करता येईल, याचा हिशोबीपणा शेतकऱ्यांमध्ये येईल. आता गुजरातच्या चारणका गावात सोलार पार्क जवळील काही शेतकऱ्यांची घरे पूर्णतः सौरऊर्जेवर चालतात. घरात सौर कुकिंग सिस्टम, एलईडी लाइटिंग, आणि बॅटरी स्टोरेज युनिट्स आहेत.

Sustainable Home
Crop Loan : कृषिकर्ज पुरवठ्यात आमूलाग्र बदलाची गरज ः शेखर गायकवाड

पंजाबमध्ये काही शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी शेतीतून मिळणारा कचरा बायोगॅससाठी वापरतात. त्यांचे घर शेतातच असून तिथे बायोगॅस युनिट, पाण्याचा पुनर्वापर, आणि इंटरनेटसह स्मार्ट ऑफिस असते. केरळमध्ये काही शेतकरी बायोफार्मिंग करत असून त्यांनी बांबू, नारळाच्या साली व मातीचे ब्लॉक्स वापरून पर्यावरणस्नेही घरे उभारली आहेत. तमिळनाडूमधील काही शेतकरी घरात डिजिटल शाळा, स्मार्ट स्क्रीन, आणि बाजाराशी थेट जोडलेली इंटरनेट प्रणाली वापरत आहेत.

व्हॉइस असिस्टंट, स्थानिक भाषेतील स्मार्ट स्क्रीन, आणि दूरदृश्य प्रणाली हे शेतकऱ्यांचे काम सोपे करतील. घरातच आरोग्य तपासणी करणारी उपकरणे, वृद्ध आणि बालकांसाठी सुरक्षितता प्रणाली आता थेट शेतकऱ्याच्या घरामध्ये दिसतील. दिव्यांग मुलांना पूर्वी घरातच बसून रहावे लागत असे.

आता मात्र साधनांचा वापर करून त्यांना शिकता येईल व स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. भविष्यातील शेतकऱ्यांच्या घरात बहुउद्देशीय आणि मॉड्युलर रचना असलेली घरे असतील व याच घरांच्या आवारात छोटे प्रक्रिया केंद्र, कार्यशाळा, प्रयोगशाळा व डिजिटल कामकाज केंद्र असेल. हा बदल फक्त शेतीपुरता मर्यादित न राहता, उत्पन्नाचे विविध स्रोत असलेल्यांना अनुकूल असेल.

वाढत्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करता, शेतकऱ्यांची घरे हवामानाच्या दृष्टीने सुरक्षित असतील. भविष्यातील घरे महिला आणि कुटुंबकेंद्रीत असतील. स्वयंपाकघर हवेशीर आणि स्वच्छ असेल, तसेच स्वच्छतागृह सुरक्षित आणि खाजगी असेल. घरे आधुनिक असूनही परवडण्यासारखी असावी, यासाठी कमी खर्चाच्या थ्रीडी प्रिंटिंगने बांधलेली घरे, प्रीफॅब्रिकेटेड मॉड्युल्स, मातीचे ब्लॉक्स अशा नवकल्पना वापरल्या जातील. भविष्यातील घर हे शेतीपासून वेगळे न राहता, त्याचाच एक भाग असेल.

घरात ओटी, प्रार्थना कक्ष, आंगण, अशा पारंपरिक गोष्टी जपल्या जातील. मात्र त्यासोबत आधुनिक सुविधा, ऊर्जा बचत आणि डिजिटल जोड असेल. म्हणजेच परंपरा आणि तंत्रज्ञानाचा समतोल साधलेला असेल. भारतातील शेतकऱ्यांची भविष्यातील घरे ही केवळ वास्तुशिल्पाची कल्पना नसून, ती सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे प्रतीक असतील व त्या परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरतील. खेडी स्मार्ट असतील, जिथे शेतकऱ्यांची घरे केवळ वास्तव्याचे ठिकाण नसतील, तर ते शाश्वत, सशक्त, आणि आधुनिक ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन घडवतील.

shekharsatbara@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com