Farmers First: पैसे थकविणाऱ्यांचे परवाने निलंबित करा; माणिकराव कोकाटे

Nashik News: शेतकऱ्यांनी कष्ट करून माल पिकवायचा, तो व्यापाऱ्यांना विकायचा आणि व्यापाऱ्याने पैसे द्यायचे नाहीत, हे चालणार नाही. शेतकऱ्यांचे थकित पैसे आठ दिवसांत मिळाले पाहिजेत. एकीकडे बाजारात शेतीमालाला चांगले पैसे मिळत नाहीत.
Farmers First
Farmers FirstAgrowon
Published on
Updated on

Nashik News: ‘‘शेतकऱ्यांनी कष्ट करून माल पिकवायचा, तो व्यापाऱ्यांना विकायचा आणि व्यापाऱ्याने पैसे द्यायचे नाहीत, हे चालणार नाही. शेतकऱ्यांचे थकित पैसे आठ दिवसांत मिळाले पाहिजेत. एकीकडे बाजारात शेतीमालाला चांगले पैसे मिळत नाहीत. दुसरीकडे मालाची विक्री होऊनही पैसे मिळत नाहीत.

खासगी बाजार समित्या व्यवस्थितरीत्या चालणार नसतील. त्या शेतकऱ्यांच्या पैशांची हमी घेणार नसतील, तर त्यांचे परवाने निलंबित करा,’’ अशा सूचना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पणन संचालकांशी बोलताना केल्या.

Farmers First
Farmer Loan Waive : कर्जमुक्ती, ‘नमो सन्मान’वरून सरकारला जाब

देवळा तालुक्यातील श्री रामेश्‍वर कृषी मार्केट येथे शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला. मात्र पैसे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक आहेत. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांची वेळ मागितली होती.

Farmers First
Farmer Family Issue: आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे काय?

यावर नंदुरबार जिल्ह्याचा दौरा आटोपून परत जात असताना कृषिमंत्र्यांनी लोहोणेर ग्रामपंचायतीत कांदा उत्पादकांची भेट घेतली. या वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. श्री. कोकाटे यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन, शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक सहन केली जाणार नाही.

पैसे थकविणाऱ्या व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना पैसे द्या, असे आदेश दिले. या वेळी त्यांनी पणन संचालक व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी फोनवरून संपर्क साधून कार्यवाहीच्या सूचना केल्या. श्री रामेश्‍वर मार्केटमध्ये कांदा विक्रीचे पैसे मिळाले नाहीत, असे अनिल आहेर, अशोक गुंजाळ, विवेक देशमुख यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com