Sugarcane Council : प्रति टन ३७०० रुपये पहिली उचल द्यावी : राजू शेट्टी

Raju Shetti : यंदाच्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसास कारखान्यांनी ३७०० रुपये प्रति टन पहिले उचली देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : यंदाच्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसास कारखान्यांनी ३७०० रुपये प्रति टन पहिले उचली देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. गतवर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपूर्वी तातडीने २०० रुपये दुसरा हप्ता देण्यात यावा, असेही श्री. शेट्टी यांनी सांगितले.

जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. २५) झालेल्या ऊस परिषदेत बोलत होते. या वेळी सावकार मादनाईक, शिवाजीराव रोढे, महेश खराडे, वैभव कांबळे, रसिका ढगे, राजेंद्र गडयाणवार, प्रकाश पोफळे, कर्नाटकचे माजी मंत्री शशिकांत खोत, पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे आदींची या वेळी भाषणे झाली.

Raju Shetti
Raju Shetti News: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन
  • परिषदेत संमत झालेले ठराव असे राज्य सरकारने तातडीने सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करून एकाच सिस्टिममधील सॉफ्टवेअरमध्ये काटे बसवावेत.

Raju Shetti
Sugarcane Production : आधुनिक तंत्रज्ञान वापरातून उसाचे एकरी शंभर टन उत्पादन शक्य
  • वाहतूक खर्चाचे टप्पे २५ किमी. ५० किमी व त्याहून अधिक असे करावेत व तशी वजावट एफआरपीमधून करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांनी खुद्द तोडणी वाहतूक करून ऊस पुरवठा केल्यास कारखान्यांनी पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना द्यावी.

  • खांडसरी व गूळ प्रकल्प यांनाही सिरपपासून इथेनॉल करण्याची परवानगी द्यावी.

  • नाबार्डने साखर कारखान्यांना साखर तारण कर्ज ३ टक्के व्याज दराने देण्यात यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com