Kolhapur Sugarcane Frp : कोल्हापूर जिल्ह्यात उसाची पेटवापेटवी, शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान

Sugarcane Protest : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊसदाराच्या मुद्दावरून दोन्ही जिल्ह्यातील कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात जोरदार संघर्ष
Kolhapur Sugarcane Frp
Kolhapur Sugarcane Frpagrowon
Published on
Updated on

Kolhapur Agriculture News : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊसदाराच्या मुद्दावरून दोन्ही जिल्ह्यातील कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात जोरदार संघर्ष पहायला मिळत आहे. दरम्यान शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात अद्यापही तोडगा न निघाल्याने शेतकरी ऊस तोडीच्या प्रतिक्षेत आहे. तर एकीकडे ऊसतोडी बंद असताना शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातील उसाला आगी लावण्याचे प्रकार समोर येत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि शिरोळ या दोन तालुक्यात हे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली या गावात मागच्या आठ दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २० एकर ऊस अज्ञातांनी पेटवला.

असाच प्रकार शिरोळ तालुक्यात घोसरवाड (ता. शिरोळ) येथे अज्ञाताकडून वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या आगीत तब्बल ४५ एकरांतील ऊस जळून खाक झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. याचबरोबर मागच्या महिन्याभरापूर्वी अब्दुललाट येथेही असाच प्रकार समोर आला होता.

मागच्या आठ दिवसांपासून पट्टण कोडोली भागात अरुण माळी, महेंद्र जाधव, महादेव पोवार (जाधव,),नागेंद्र तोडकर, सुरेश तोडकर, दीपक तोडकर, राहुल तोडकर, रविंद्र तोडकर, कपिल चौगुले, रघु माळी, अजित शिरोळे, बाळासाहेब खटकोळे, पुरंदर वळिवडे, महादेव जाधव आणि बापूसो जाधव या पट्टण कोडोलीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला अज्ञातांकडून आग लावण्याचे प्रकार घडले.

Kolhapur Sugarcane Frp
Sugarcane Rate : कोल्हापुरात ऊस आंदोलनाचा उडाला भडका, अज्ञातांनी ट्रॅक्टर पेटवला!

तर गेल्या दोन तीन दिवसांपासून घोसरवाड येथे एकाच भागात वेगवेगळ्या गटांमध्ये अज्ञातांकडून उसाच्या फडाला आग लावली जात असून यामध्ये ४५ एकर पेक्षा जास्त ऊस जळाला आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी दीपक संकपाळ, महादेव संकपाळ, गौराबाई संकपाळ, विश्वास मांजरे, दिनकर मांजरे, शंकर मांजरे, मंगल मांजरे, आनंदा शिंदे, यशवंत शिंदे, श्रीकांत शिंदे, संभाजी मेटकर.

महावीर बारवाडे, संजय बारवाडे, अभिजित बरवाडे संजय कांबळे, विठ्ठल संकपाळ, अण्णा कांबळे, दिलीप कांबळे, रजिया अपराध, विजयसिंह मोहिते, राजेंद्र मोहिते, राजू माने, लक्ष्मण माने, बाजीराव माने यांच्या उसाच्या फडाला अज्ञाताकडून आग लावली गेली. ऊसदराच्या आंदोलनामुळे जळीत ऊस कुठे पाठवायचा याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com