Agriculture Graduate Recruitment : कृषी पदवीधरांना नोकरभरतीची प्रतीक्षा

Agriculture University Employment : राज्य शासनाने सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार सरळ सेवा कोट्यातील १०० टक्के पदभरतीला मुभा दिली आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Akola News : राज्य शासनाने सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार सरळ सेवा कोट्यातील १०० टक्के पदभरतीला मुभा दिली आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठातील रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला, असा समज कृषी पदवीधरांमध्ये झाला होता. मात्र महिनोन् महिने नोकरभरतीबाबत काहीही हालचाल दिसत नसल्याने हे तरुण प्रतीक्षेत थांबले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारने दीड लाख पदभरती घोषित केल्यानंतर ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयाने सरळ सेवा कोट्यातील १०० टक्के पदभरतीला मुभा देण्यात आली. या निर्णयानंतर बेरोजगार तरुणांच्या नोकरीविषयी अपेक्षा उंचावल्या.

कृषी पदवीधरही नोकरीच्या आशेला लागले होते. या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह इतर विद्यापीठांतील पदभरतीचा ही मार्ग मोकळा झाला.

Agriculture Department
Agriculture Department News : कृषी विभागातील पदोन्नत्यांचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा

रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढलेला आहे. रिक्त पदांचा अनुशेष दर महिन्याला वाढतोच आहे. कार्यालयीन, फिल्डवरील, शैक्षणिक कामकाज पाहण्यासाठी वेगवेगळ्या पदांचा अनुशेष तयार झालेला आहे. कृषी पदवीधर हे विद्यापीठांतर्गत कृषी सहायक, वरिष्ठ संशोधन सहायक, कनिष्ठ संशोधन सहायक अशा पदांच्या जाहिरातीची प्रतीक्षा करून थकले.

पदभरती मोकळी झाल्यानंतर निर्माण झालेले आनंदाचे वातावरण आता हळूहळू लोप पावत आहे. परीक्षेच्या दृष्टीने महिनोन् महिने तयारी करीत असलेले हे उमेदवार जागाच भरल्या जात नसल्याने निराशेच्या गर्तेत जाण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठ स्तरावर नोकरभरतीच्या दृष्टीने काही पावले का उचलली जात नाहीत, तांत्रिक अडचणी काय आहेत, याची माहिती या बेरोजगार कृषी पदवीधारकांजवळ नाही.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभागाच्या इमारतींसाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश

या भरतीबाबत मध्यंतरी कृषी पदवीधरांना आश्‍वस्तही करण्यात आले होते. तत्कालीन कृषिमंत्र्यांनी लवकरच भरती होईल, असे सांगितले. मात्र हे घोडे कुठे अडले ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. कृषी पदवीधरांनी विद्यापीठ प्रशासनाला या नोकरभरतीबाबत वेळोवेळी निवेदने देत स्मरण करून दिले. तरीही सध्या कुठलीही अपेक्षा दिसत नसल्याची स्थिती आहे.

निराशेने ग्रासले

मागील काही वर्षांपासून नोकरभरती होत नसल्याने कृषी पदवीधरांमध्ये कमालीचे नैराश्‍य तयार होत आहे. नोकरभरती तातडीने करावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. परंतु त्याला यश मिळत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com