Sugarcane Rate : कोल्हापुरात ऊस आंदोलनाचा उडाला भडका, अज्ञातांनी ट्रॅक्टर पेटवला!

Sugarcane Protest : गतवर्षी तुटलेल्या उसाचे प्रतिटन चारशे रुपये शेतकऱ्यांना द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे.
Sugarcane Rate
Sugarcane Rateagrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugarcane Rate : शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून आक्रोश पदयात्रा काढून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध कारखान्यांना निवेदने दिली जात आहेत. काही कारखान्यांची साखर वाहतूकदेखील रोखण्यात आली असताना खासगी व कारखान्याला ऊस पुरवठा करणारा ट्रॅक्टर अज्ञातांनी पेटवला.

मंगळवारी रात्रीच्या या घटनेने ऊस दराचे आंदोलन उग्र होऊ लागले आहे. घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी पाहणी केली.

गतवर्षी तुटलेल्या उसाचे प्रतिटन चारशे रुपये शेतकऱ्यांना द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू असताना निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे खासगी कारखान्यासाठी ऊस नेणारा ट्रॅक्टर अज्ञातांनी पेटवला.

ही घटना मंगळवारी (ता. २४) रात्रीच्या सुमारास घडली. आगीत ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चारशे रुपयांच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

Sugarcane Rate
Sugarcane Rate : 'स्वाभिमानी'ने साखर अडवू नये कारखानदार अडचणीत, भोगावतीकडून राजू शेट्टींना निवेदन

४०० रूपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. चिपरी (ता. शिरोळ) येथील घोडावत गुळ कारखान्याने उसाची पहिली उचल जाहीर न करताच ऊस तोड सुरू केली होती. काल रात्रीच्या सुमारास निमशिरगाव येथून उसाची वाहतूक सुरू असताना संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com