Poultry Farming : पोल्ट्री व्यावसायिकांसाठी जिल्हास्तरावर हेल्पलाइन

Poultry Industry : राज्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय वाढीस लागला आहे. तब्बल ९ लाखांपेक्षा शेतकरी या व्यवसायात आहेत. यातील काहींना वैयक्‍तिकस्तरावर भांडवल उभे करणे शक्‍य होत नाही.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

Nagpur News : जिल्हास्तरावर शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कुक्‍कुटपालकांच्या समस्यांचे निवारण होत नव्हते. अशी कोणतीच यंत्रणा अस्तित्वात नव्हती. अशा प्रकारची यंत्रणा जिल्हास्तरावर असावी, याकरिता कुक्‍कुट व्यावसायिकांनी पाठपुरावा केला होता. त्याचीच दखल घेत १९६२ तसेच १८००२३३३०४१८ असे दोन टोल फ्री क्रमांक आता उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

राज्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय वाढीस लागला आहे. तब्बल ९ लाखांपेक्षा शेतकरी या व्यवसायात आहेत. यातील काहींना वैयक्‍तिकस्तरावर भांडवल उभे करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून करारावर हा व्यवसाय केला जातो. अशा शेतकऱ्यांना या क्षेत्रातील कंपन्या एक दिवसाच्या पिलांसह, औषधी, खाद्य व इतर बाबींचा पुरवठा करतात.

Poultry Farming
Poultry Farming : गावरान कोंबडीपालन ठरले अल्पशेतीला फायदेशीर

यामध्ये केवळ संबंधित शेतकऱ्याकडे पोल्ट्री शेड असण्याची एकमेव अट आहे. परंतु गेल्या काही वर्षांत करारदार कंपन्यांकडून एकतर्फी करार करून शेतकऱ्यांचे शोषण होत असल्याचे आरोप वाढीस लागले. अशा प्रकारच्या तक्रारींच्या निवारणासाठी त्यातूनच मग जिल्हास्तरावर हेल्पलाइनचा मुद्दा उपस्थित झाला.

Poultry Farming
Poultry Policy : खाण्यायोग्य कोंबडीच्या वजनासाठी ठरणार धोरण ; ‘पशुसंवर्धन’ने मागितला ‘माफसू’कडे अहवाल

समितीच्या बैठकीतही यावर वारंवार मंथन झाले. त्याची दखल घेत आता जिल्हास्तरावर अशा तक्रारींच्या सोडवणुकीसाठी पशुसंवर्धन विभागाकडून हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

त्यामध्ये १९६२ तसेच १८००२४४०४१८ अशा दोन क्रमांकांचा समावेश आहे. यावर शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्‍त डॉ. हेमंत वसेकर यांनी दिले.

करारावरील पोल्ट्री व्यवसायिकांचे अनेक प्रश्‍न आहेत. त्याच्या सोडवणुकीसाठी हेल्पलाइन असावी, अशी मागणी होती. त्याची दखल घेत पशुसंवर्धन आयुक्‍तांनी तसे लेखी निर्देशच जारी केले आहेत. छोट्या पोल्ट्री व्यवसायिकांना त्यांचे प्रश्‍न मांडण्यास याचा उपयोग होईल.
- शुभम महाले, सदस्य, राज्यस्तरीय समन्वय समिती, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com