
Maharashtra Agriculture Success Story: बुलडाणा जिल्ह्यातील कासारखेड (ता. मेहकर) येथील अमोल ज्ञानेश्वर मवाळ यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा पुरविण्याच्या ध्यासातूनच नोकरी सोडून छत्रपती संभाजीनगर येथे सक्सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेडची उभारणी केली. शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा पुरविण्यासाठी त्यांची चार राज्यात सुमारे ४५ जणांची टीम सक्षमपणे कार्यरत आहे. एकेकाळी नोकरी करणाऱ्या अमोल मवाळ यांनी अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमताही स्वत:मध्ये निर्माण केली आहे.
कासारखेडचे अमोल मवाळ यांनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून २०१० मध्ये कृषी शास्त्रातील पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी २०१० ते २०१७ पर्यंत घरडा केमिकल, सोलार सीड्ससारख्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. नोकरी करीत असतानाच त्यांचा भर प्रामुख्याने उत्तम अनुभव घेण्यावर होता. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला. आज आपण अन्य कंपन्यांद्वारे उत्पादित निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत, त्या आपण स्वतःही तयार करू शकतो, इतपत मिळालेला हा आत्मविश्वासच त्यांना स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा मंत्र देऊन गेला.
दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा आपणही शेतकऱ्यांसाठी, शेती क्षेत्रासाठी काहीतरी करावे, त्यांना स्वस्तामध्ये अति उच्च दर्जाच्या निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, हा उद्देश ठेवत त्यांनी ‘सक्सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेड’ची बीजे रोवली. त्या ध्यासातून त्यांनी अभ्यासासाठी म्हणून गुजरात दौरा केला. गुजरातमधील नामांकित केमिकल कंपन्यांना भेटी दिल्या. बाजाराचा आढावा घेताना त्यांना एका कंपनीच्या काही उत्पादनांना महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये चांगली मागणी असल्याचे लक्षात आले. मग त्यांनी धाडस करत या कंपनीशी टायअप केले.
नोकरी करीत असतानाच मनात असलेल्या कंपनी स्थापण्याच्या विचाराला २०१७ मध्ये मूर्तरूप मिळाले. त्यासाठी गुजरातमधील नामांकित केमिकल कंपनीशी टायअप केले होते. त्यातून कीडनाशके निर्मितीपासून आपल्या कल्पनेतील दर्जेदार निविष्ठांच्या उत्पादनाला प्रारंभ केला. त्यानंतर एकेक करत ते वॉटर सोल्युबल, सूक्ष्म अन्नद्नव्ये सेंद्रिय निविष्ठांच्या उत्पादनाकडे वळले. आजघडीला जवळपास १५७ उत्पादने त्यांनी बाजारात आणली आहेत. त्यांच्या ‘ट्रान्स्फॉर्मर’ या उत्पादनासह अन्य सर्वच उत्पादनांना शेतकऱ्यांची मोठी पसंती मिळत असल्याचे अमोलराव सांगतात.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अमोलराव मवाळ यांच्या कुटुंबाकडे वडिलोपार्जित सुमारे १२ एकर शेती. हंगामी बागायती असलेल्या या शेतीत त्यांचे वडील राबत असतात. लहानपणापासून शेतीशी जवळीक असलेल्या अमोलरावांना आपल्या वडिलांकडून शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा, अडचणींची माहिती मिळत गेली. खरेतर या समस्या दूर करण्याच्या उद्देशाने त्यांची पावले कृषिशास्त्र पदवी व त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणाकडे वळली होती. त्यांचे लहान बंधू शिवराज मवाळ यांनी बी.फार्म.ची पदवी घेतलेली असून, ते सध्या ‘सक्सेस बीज सायन्स’मध्येच ‘मार्केटिंग इन्चार्ज’ म्हणून काम पाहतात.
एखादे उत्पादन केवळ उत्पादित करण्यापर्यंत मर्यादित न राहता, त्या उत्पादनाचा वापर कसा करायचा, त्याचे फायदे काय हे सामान्य शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रात्यक्षिकातून वापराचे फायदेविषयक माहिती देण्याचा अमोल मवाळ यांचा प्रघात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यावर लगेच विश्वास बसतो. उत्पादनाच्या विस्ताराचा हा मार्ग त्यांना यशाकडे घेऊन जात आहेत. त्यामुळे त्यांच्या सक्सेस बीज सायन्स या कंपनीचा कार्यविस्तार महाराष्ट्रासोबतच शेजारच्या आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश अशा चार राज्यांत विस्तारला आहे, असे अमोल मवाळ सांगतात.
सातत्य, एकनिष्ठता, कष्टाळू, स्वतंत्र व येणाऱ्या सर्व आपत्तींना तोंड देत अभिमान बाळगावा असे काम आपल्या देशातील शेतकरी करतो आहे. सक्सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी शेतकऱ्यांच्या याच ध्यासाला सशक्त बनविण्याच्या दिशेने दर्जेदार निविष्ठा उत्पादनाच्या माध्यमातून आपले योगदान देण्याचे काम करते आहे. देशातील प्रत्येक राज्य व भागातील शेती व पिकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. परंतु संशोधन, तंत्रज्ञान व सर्वांच्या साथीतून या सर्व समस्यांवर मात करता येणे शक्य आहे, यावर आमचा विश्वास आहे.
‘सक्सेस बीज सायन्स’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या दर्जेदार निविष्ठा निर्मितीलाच प्राधान्य दिले जाते. आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून पीक व जमीन या दोहोंचीही काळजी कशी घेतली जाईल, याचाही विचार केला जातो. शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे वितरण करतानाही शेतकऱ्यांनी दिलेल्या किमतीचे पुरेपूर मूल्य त्यांना मिळाले पाहिजे, हेच कंपनीचे धोरण राहिले आहे. आपल्या प्रत्येक निविष्ठा खरेदीदाराचे उत्पादनाच्या वापरातून समाधान होईल याचीही खबरदारी घेतली जाते. दर्जेदार उत्पादन आणि शेतकऱ्यांचे समाधान हेच ‘सक्सेस बीज सायन्स’ च्या मिशनमध्ये समाविष्ट केलेले आहे. शेतकऱ्यांसाठी काम करताना संशोधन आणि सुधारणेला सतत वाव असतो. त्यामुळे अन्य उत्पादकांची निविष्ठा उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवितानाही ती दर्जेदारच असतील, यावर भर असतो. स्वतःच्या उत्पादनामध्ये सातत्यपूर्ण संशोधनाला प्राधान्य दिले जाते.
बाजारातील बदलांमुळे होणाऱ्या
फायद्याचा शोध.
विज्ञान, समाज आणि मूल्यवर्धन वाढीसाठी एक संधी म्हणून याचा वापर.
संशोधन व तंत्रज्ञानाच्या पातळीवर आपल्या आघाडीच्या स्थानाचा वापर.
नवीन व्यवसायाच्या संधी ओळखण्याची तत्परता.
संशोधनातून उद्भविलेल्या सहक्रियात्मक प्रभावांचा वापर करण्यावर भर.
उत्पादने आणि सेवा अधिक विकसित व परिणामकारक करण्यावर विशेष भर.
- अमोल ज्ञानेश्वर मवाळ
९९७५०३०३५५
कार्यकारी संचालक, सक्सेस बीज सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.