
Pune News : आपल्याला विविध कामांमध्ये आधार कार्डचा वापर हा करावा लागतो. तर ते नसेल तर रेशन पासून सिमकार्डपर्यंत काहीच मिळू शकत नाही, अशी सद्यस्थिती आहे. याचदरम्यान आता शालेय ते महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांना आधार सारखेच ‘अपार कार्ड’ बनवावे लागणार आहे. जे पालंकाच्या संमतीने तयार केले जाईल. पण ते कसे बनवले जाते? त्याचे फायदे काय आहेत? आणि आतापर्यंत ते किती विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. याबाबत ही माहिती...
काय आहे 'अपार कार्ड'?
‘अपार कार्ड’चा पुर्ण अर्थ ‘स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी’ असा आहे. या कार्डमधून सरकार मुलांसाठी १२ अंकी ओळखपत्र बनवणार. जो त्यांचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत कायम राहील. तर त्या विद्यार्थ्याने जरी शाळा बदलली तरी त्याचा अपार आयडी एकच राहणार आहे. तसेच या ‘अपार कार्ड’ला त्याचे सध्याचे आधार कार्ड लिंक करण्यात येणार आहे. यामुळे आधारची सर्व माहिती ही जशाच्या तशी ‘अपार कार्ड’मध्ये जातील.
कसे बनवाल ‘अपार कार्ड’?
'अपार कार्ड' बनवण्यासाठी विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच 'डिजिलॉकर'वर खाते असणे आवश्यक आहे. यासह विद्यार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले असावे. यानंतर संसंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांकडून ‘अपार कार्ड’ जारी केले जाईल. यासाठी नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती असणे गरजेची आहे.
त्याप्रमाणे शाळा किंवा महाविद्यालयांकडून परवानगी घेतली जाईल. तर विद्यार्थ्यांना एक अर्ज दिला जाणार असून तो पालकांकडून भरून घेतला जाणार असून तोच अपलोड केला जाईल. यानंतर त्या विद्यार्थ्यांचे 'अपार कार्ड' बनवले जाईल आणि ते विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. यासाठी फी द्यावी लागणार नाही. तर पालक 'अपार कार्ड' नाकारू शकतात.
काय आहेत याचे फायदे?
१) 'अपार कार्ड'धारक विद्यार्थ्यांना बस प्रवासात अनुदान मिळू शकते.
२) 'अपार कार्ड' धारक विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क भरण्याचीही सोय होऊ शकते.
३) या कार्डामुळे विद्यार्थ्यांना सरकारी संग्रहालयात मोफत प्रवेश मिळू शकतो.
४) विद्यार्थ्यांना पुस्तके आणि स्टेशनरीवरही सवलत मिळू शकते.
काय आहेत याचे फायदे?
५) मनोरंजन पार्क आणि वसतिगृहांसाठी सबसिडी माफ केली जाऊ शकते.
६) आधार कार्ड आणि अपार कार्ड ही एकच गोष्ट आहे याबद्दल अजूनही काही लोकांच्या मनात शंका आहे, पण तसे अजिबात नाही.
७) आधार कार्ड देशातील प्रत्येक नागरिकासाठी आहे. जो सर्व सुशिक्षित आणि अशिक्षितांसाठी आहे. पण अपार कार्ड हे फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे. जे शिक्षण घेत आहेत.
किती अपार कार्डचे वाटप?
जसे आधार कार्ड देशासाठी एकच आहे. त्याचप्रमाणे देशातील विद्यार्थ्यांसाठी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ म्हणून 'अपार कार्ड'च्या योजनेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. ही एक महत्वकांक्षी योजना असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. तसेच आतापर्यंत देशातील २५ कोटी विद्यार्थ्यांना अपार कार्डचे वाटप करण्यात आले असून हे कार्ड त्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक, क्रीडाविषयीचा बायोडाटा असेल असेही ते म्हणालेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.