sandeep Shirguppe
केंद्र सरकारने माणसाप्रमाणे जनावरांची ओळख निर्माण करण्यासाठी नवीन पद्धत अमलात आणली आहे.
ऑनलाइन नोंदणीद्वारे जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, जनावरे खरेदी-विक्रीची माहितीसह प्रवर्ग, जात आदी माहिती एकत्रित करण्यात येणार आहे.
'भारत पशू' अॅपद्वारे ही माहिती जिल्हा परिषद व 'गोकुळ' दूध संघाच्या माध्यमातून संकलित केली जाणार आहे तर जनावरांचे टॅगींगही होणार.
'ई-गोपाल अॅप' वर पशुपालकांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.
अलर्ट पर्यायामध्ये पशुपालकांना लसीकरण कॅम्प, कृत्रिम गर्भधारणा पद्धत, जातीवंत जनावरांचे वीर्य, सीमेन विक्रीची माहिती मिळणार आहे.
इनाफ'द्वारे १० लाख जनावरांची नोंदणी यापूर्वी संकलित केलेली आहे. त्यामध्ये सर्व प्रवर्गातील १० लाख जनावरांची नोंदणी झालेली आहे.
शेतकऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांची माहितीही या अॅपमधून मिळणार आहे
जनावरांचे टॅगिंग करून जनावरांना नंबर देण्यात येणार आहेत माणसाप्रमाणे त्याचेही आधारकार्ड तयार होणार आहे.