Agri Hackathon 2025: ‘छत्रपती शाहू अभियांत्रिकी’च्या विद्यार्थ्यांना १५ लाखांचे पारितोषिक

Smart Farming: कांचनवाडी येथील छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 'ट्रेंडक्राफ्टर्स' विद्यार्थी गटाने आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेत दुसरे स्थान मिळवून १५ लाखांचे पारितोषिक जिंकले.
Agri Hackathon 2025
Agri Hackathon 2025Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar: कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेंडक्राफ्टर्स (TrendCrafters) या विद्यार्थ्यांच्या गटाने पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचे १५ लाखांचे पारितोषिक पटकावले.

हा पुरस्कार केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत जगभरातून सुमारे ८०० हून अधिक प्रोजेक्ट्सची नोंदणी झाली होती.

Agri Hackathon 2025
Agri Hackathon 2025: पुण्यात उद्यापासून ‘कृषी हॅकेथॉन’

यापैकी १४० प्रोजेक्ट्सची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली, ज्यामध्ये छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकूण ३२ विद्यार्थी व ०३ प्राध्यापक वृंद यांच्यासह ८ गट सहभागी झाले होते.

Agri Hackathon 2025
Agri Hackathon 2025: ‘हॅकेथॉन’मध्ये जाणून घ्या शेतीचे नवीन तंत्रज्ञान

यामध्ये महाविद्यालयाच्या ‘ट्रेंडक्राफ्टर्स’ गटाने सादर केलेल्या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक पटकावला. या अभिनव प्रकल्पात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून स्थानिक बाजारातील पीक दरांचे विश्लेषण करून, शेतकऱ्यांना संभाव्य किमतींचा अंदाज व स्मार्ट निर्णय घेण्यासाठी मदत केली जाते.

यामुळे शाश्वत व फायदेशीर शेतीस चालना मिळणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत प्रा. डॉ. अश्विनी गवळी यांनी मार्गदर्श म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे आणि सचिव पद्माकरराव मुळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीने अत्यंत अभिमानीत आहोत. कठोर परिश्रम, निरंतर प्रयत्न आणि तंत्रज्ञानावरील ज्ञानाचे प्रतीक आहे. हॅकेथॉन स्पर्धा अशा प्रतिभाशाली विद्यार्थींना त्यांच्या कौशल्याचा पुरेपूर वापर करण्याची संधी देते.
- समीर मुळे, विश्वस्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com