Bidri Sugar Factory : कारवाई मागे घ्या, अन्यथा तीव्र लढा, 'बिद्री’च्या शेतकरी, सभासदांचा कागल तहसीलवर मोर्चा

Bidri Ethanol Project : ‘१३५ कोटी रुपयांचा इथेनॉल प्रकल्प बंद पाडणाऱ्या तपास यंत्रणेचा धिक्कार असो’ अशा आशयाचे फलक घेऊन सभासद मोर्चात सहभागी झाले होते.
Bidri Sugar Factory
Bidri Sugar Factoryagrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ५७ हजार सभासद असलेल्या कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवा ई केली. दरम्यान यावर राधानगरी, कागल, भुदरगड तालुक्यातील सभासद शेतकऱ्याना मोठा फटका बसणार आहे. ही कारवाई चुकीची असून, त्याच्या निषेधार्थ कारखान्याचे शेतकरी, सभासदांनी कागल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून निषेध नोंदविला.

यावेळी मोर्चेकऱ्यांनी कारखान्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अन्यथा तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला.

मोर्चाला कागल तालुका खरेदी-विक्री संघापासून सुरुवात झाली. घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ‘आमचा दर भारी, आमचा कारभार भारी’, ‘सभासद, ऊस उत्पादकांचा बिद्री कारखाना वाचला पाहिजे’, ‘१३५ कोटी रुपयांचा इथेनॉल प्रकल्प बंद पाडणाऱ्या तपास यंत्रणेचा धिक्कार असो’ अशा आशयाचे फलक घेऊन सभासद मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार अमरदिप वाकडे यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, ‘देशातील निम्याहून अधिक कारखाने एफ.आर.पी. देऊ शकत नाहीत. मात्र, बिद्री साखर कारखाना देशात एक नंबरचा दर देतो. शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करणाऱ्या या कारखान्यावर राजकीय द्वेषातून कारवाई केली जात आहे. हा कारखाना वाचला पाहिजे. यासाठी यापुढेही लढाईसाठी सज्ज राहूया.’

Bidri Sugar Factory
Kolhapur Rain : कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; ७ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग

गोकुळचे संचालक अंबरीष घाटगे म्हणाले, ‘बिद्री कारखान्यावर केलेली कारवाई, सभासद शेतकऱ्यांची मोठी हानी करणारी आहे. ती कारखान्यावर नसून ६५ हजार कारखान्यांच्या सभासदांचे भविष्य नष्ट करणारी आहे. तसेच ती पवित्र सहकार चळवळ मोडीत काढणारी आहे.’

यावेळी गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, प्रवीण भोसले, दत्ता सावंत, दत्ता पाटील-केनवडेकर, अशोक चौगुले, मनोज फराकटे यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चात बिद्रीचे संचालक प्रविण पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, नवल बोते, विकास पाटील, शशिकांत खोत, संभाजी भोकरे, चंद्रकांत गवळी, इरफान मुजावर, संजय चितारी, नितीन दिंडे, यांच्यासह कारखान्याचे सभासद आणि शेतकरी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com