Devna Irrigation Project : देवना सिंचन प्रकल्पाच्या कामाला कार्यारंभ आदेश प्राप्त

Maharashtra Water Conservation Corporation : महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित ९ कोटी ४७ लक्ष रुपयांच्या देवना सिंचन प्रकल्पाच्या कामाला कार्यारंभ आदेश प्राप्त झाले आहे.
Devna Irrigation Project
Devna Irrigation Project Agrowon
Published on
Updated on

Nashik News : महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित ९ कोटी ४७ लक्ष रुपयांच्या देवना सिंचन प्रकल्पाच्या कामाला कार्यारंभ आदेश प्राप्त झाले आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित देवना सिंचन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पास ९ कोटी ४७ लक्ष रकमेच्या कामास कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून फॉरेस्ट क्लिअरन्स नंतर या कामाला सुरवात होणार आहे. कंत्राटदाराला हे काम मिळण्यानंतर कंत्राटदाराने पाठपुरावा करून फॉरेस्ट क्लिअरन्स करण्याचे बंधन या कामाच्या अटीशर्तींमध्ये आहे. त्यामुळे कंत्राटदाराच्या पाठपुराव्यामुळे फॉरेस्ट क्लिअरन्स च्या कामाला मदत होणार आहे.

Devna Irrigation Project
Devna Irrigation Project : ‘देवना’च्या वाढीव मोबदल्याचा मार्ग मोकळा

वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पास १२ कोटी ७७ लक्ष रकमेच्या या कामाला २१ जानेवारी २०२१ रोजी जलसंधारण महामंडळाकडून मंजुरी मिळवली होती. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०२१ ला जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता यांनी ८ कोटी ९५ लाख किमतीला तांत्रिक मान्यता दिली.

कोरोना साथरोग काळात आर्थिक निर्बंधांमुळे सर्व कामे स्थगित झाली होती. हा प्रादुर्भाव संपल्यानंतर या कामावरील स्थगिती उठवण्यात येऊन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. तीन निविदाधारकांनी निविदा भरल्या होत्या. मात्र ही योजना ही वन क्षेत्रात असल्यामुळे निविदा मंजुरीनंतर तिन्ही निविदा धारकांनी काम करण्यासाठी नकार कळवला. त्यानंतर या कामाची फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.

Devna Irrigation Project
Devna Irrigation Project : लालफितीत अडकले ‘देवनाचा’ प्रकल्पाचे काम

प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असून येवला तालुक्यातील देवदरी, खरवंडी, राहडी, कोळम खु. या गावाच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच, वन्य प्राण्यांच्या पिण्यासाठी व रोपवाटीकेसही लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ७३.४४ दलघफू पाणी वापरासाठी पाणी उपलब्धता उपलब्ध होणार आहे.

या योजनेसाठी संयुक्त मोजणीनुसार वैजापूर तालुक्यातील १३ हेक्टर व येवला तालुक्यातील ४४ हेक्टर अशी एकूण ५७ हेक्टर क्षेत्र संपादित होत आहे. त्यापैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र असून १.२५ हेक्टर क्षेत्र हे खाजगी आहे.या योजनेची एकूण किंमत ९ कोटी ४७ लक्ष असून योजनेच्या बुडीत क्षेत्रापैकी ५७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. वन विभागाच्या मान्यतेनंतर लवकरच या कामाला सुरवात होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com