Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Agriculture Crop Loan Update : शासनाने एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या पीककर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. नवीन पीककर्ज घेताना शेतकऱ्यांना पाचशे रुपयांच्या स्टॅम्पऐवजी एक रुपयाच्या तिकिटावर मिळू शकणार आहे.
Agriculture Stamp Duty
Agriculture Stamp DutyAgrowon

Satara News : शासनाने एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या पीककर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. नवीन पीककर्ज घेताना शेतकऱ्यांना पाचशे रुपयांच्या स्टॅम्पऐवजी एक रुपयाच्या तिकिटावर मिळू शकणार आहे.

सोसायटीतून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ५०० रुपयांचा स्टॅम्प द्यावा लागत नव्हता. मात्र राष्ट्रीय बँकांमधून पीककर्ज घेणाऱ्यांना तो द्यावा लागत होता. शासनाच्या महसूल व वन विभागाकडून राजपत्र प्रसिद्घ केल्याने पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांना स्टॅम्प द्यावा लागणार नाही.

Agriculture Stamp Duty
Agriculture Loan : जलद कृषिकर्जांसाठी ‘नाबार्ड’, ‘आरबीआय’ एकत्र

दरम्यान, यापूर्वी नव्याने पीककर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता. शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क घेऊन नव्याने पीककर्ज संबंधित बँक शाखेकडून दिले जायचे; परंतु आता मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय झाल्यामुळे बँकांना आता मुद्रांक शुल्क न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून बँकांना दिले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बँकेत गेल्यावर कर्जासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. नोंदणी व मुद्रांक विभागाकडून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पीककर्जावरील खर्च कमी होऊन दिलासा मिळाला आहे.

Agriculture Stamp Duty
Loan Distribution : खरीप हंगामाच्या तोंडावर कर्जवाटप केवळ ६.३३ टक्के

१ एप्रिलपासून पीककर्ज घेणारे पात्र

आता शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही, तर केवळ एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटावर पीककर्ज दिले जाईल. ही मुद्रांक शुल्क माफी केवळ एक लाख ६० हजारांपर्यंतच्या कर्जासाठीच लागू असणार आहे. १ एप्रिल २०२४ पासून नव्याने पीककर्ज घेणारे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत.

बँकांमधून एक लाख ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने मुद्रांक शुल्क माफ केले आहे. या निर्णयाचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होईल.
योगेश पाटील, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com