Kharif Crop Loan : खरीप हंगामासाठी एप्रिलमध्ये २५ टक्के पीककर्ज वाटप

Distribution of Crop Loans : खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. एक एप्रिलपासून खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली असून एप्रिलअखेर २५ टक्क्यापर्यंत खरीप पीककर्ज वाटप झाले आहे. या महिन्यात आणखी भर पडली आहे.
Agriculture Loan
Agriculture Loan Agrowon

Akola News : खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. एक एप्रिलपासून खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली असून एप्रिलअखेर २५ टक्क्यापर्यंत खरीप पीककर्ज वाटप झाले आहे. या महिन्यात आणखी भर पडली आहे.

जिल्हयात खरीप हंगामासाठी यंदा १३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. एक लाख ३६ हजार ७७५ शेतकरी खातेदारांना हे पीककर्ज वाटप केले जाईल. यापैकी आतापर्यंत ३० हजार १९४ शेतकरी खातेदारांना ३२६ कोटींचे वाटप झाले आहे. एकूण उद्दिष्टाच्या २५ टक्के पीककर्ज वाटप झालेले आहे.

Agriculture Loan
Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २६४७ शेतकऱ्यांना २७ कोटी ५१ लाख, खासगी क्षेत्रातील बँकांनी २५७ शेतकऱ्यांना ३ कोटी १४ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ३५२२ शेतकऱ्यांना ४२ कोटी ९२ लाख आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २३ हजार ७६८ शेतकऱ्यांना २५२ कोटी ४७ लाख असे एकूण ३० हजार १९४ शेतकऱ्यांना ३२६ कोटींचे वाटप झाले आहे.

शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी मशागत, बी-बियाणे, खत व इतर शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज असते. बहुतांश शेतकऱ्यांनी ३१ मार्च अखेर पीककर्जाचा भरणा करून नवीन पीककर्जासाठी अर्ज दिलेला आहे. काही बँकांकडून पीककर्ज वाटपाला सुरुवात करीत गती देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँक सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून पीककर्ज वाटप करते.

Agriculture Loan
Crop Loan : पीककर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत

राष्ट्रीयीकृत बँकांचे वाटप संथगतीने

खरीप पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी एप्रिल अखेर उद्दिष्टाच्या अवघे ५ टक्के, तर खासगी बँकांनी सात टक्केच वाटप केले. या बँकांना अनुक्रमे ४८६ कोटी आणि ३४ कोटींचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यापैकी अनुक्रमे २७ कोटी व तीन कोटी एवढेच या दोन क्षेत्रांतील बँकांनी वाटप केले होते.

दुसरीकडे जिल्हा बँकेला ६३० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलेले असून, एप्रिल अखेर बँकेने २५२ कोटींचे वाटप केले. उद्दिष्टाच्या ४० टक्क्यांवर हे वाटप बँकेने पूर्ण केले. तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेनेही १५० कोटी उद्दिष्टाच्या तुलनेत ४२ कोटी ९२ लाख म्हणजेच २८ टक्‍क्यांपर्यंत रक्कम वाटप केली.

खरीप हंगामासाठी बँकनिहाय उद्दिष्ट

बँक शेतकरी खातेदार उद्दिष्ट प्रत्यक्ष वाटप

राष्ट्रीयीकृत बँका ४६१५० ४८६ कोटी २५ कोटी ५१ लाख

खासगी बँका २१२५ ३४ कोटी ३ कोटी १४ लाख

विदर्भ कोकण १६५०० १५० कोटी ४२ कोटी ९२ लाख

जिल्हा बँक ७२००० ६३० कोटी २५२ कोटी ४७ लाख

एकूण १३६७७५ १३०० ३२६ कोटी ४ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com