Agriculture Loan : जलद कृषिकर्जांसाठी ‘नाबार्ड’, ‘आरबीआय’ एकत्र

Nabard and Rbi : शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत आणि जलदगतीने देण्यासाठी नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक एकत्र आली आहे. ‘आरबीआय इनोव्हेशन हब’ या केंद्रासमवेत भागीदारी करण्यात आली
Nabard
NabardAgrowon

Mumbai News : शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत आणि जलदगतीने देण्यासाठी नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक एकत्र आली आहे. ‘आरबीआय इनोव्हेशन हब’ या केंद्रासमवेत भागीदारी करण्यात आली असून या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना जलद गतीने कर्ज वितरण होईल आणि वेळेत मोठी बचत होईल, असे ‘नाबार्ड’चे म्हणणे आहे.  

दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दि नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटचे (नाबार्ड) अध्यक्ष शाजी के. व्ही. आणि ‘रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब’चे सीईओ राजेश बन्सल यांनी स्वाक्षऱ्या केल्या. ‘आरबीआय’ने सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी डिजिटल किसान क्रेडिट कार्ड कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कर्ज वितरण प्रणाली पोर्टल विकसित केले आहे.

Nabard
Loan Waive Scheme : ‘महाआयटी’ने मागितली कर्जाच्या ‘डाटा’साठी मुदत

‘नाबार्ड’ने कृषिकर्जासाठी लोन ओरिजिनेशन सिस्टिम पोर्टल विकसित केले आहे. याद्वारे नाबार्ड सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना कर्जपुरवठा करते.
रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबने विकसित केलेल्या विनाअडथळा कर्जासाठीच्या सार्वजनिक तांत्रिक प्रणालीशी नाबार्डने स्वत:चे किसान क्रेडिट कार्ड कर्ज ओरिजेनेशन सिस्टिम पोर्टलला जोडले आहे.

नव्या प्रणालीत ३५१ जिल्हा आणि राज्य सहकारी बँका, ४३ प्रादेशिक ग्रामीण बँकांना अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी जमिनीची महसुली कागदपत्रे, सॅटेलाइट डेटा, केवायसी, क्रेडिट इतिहास आदी  सेवा या बँकांना उपलब्ध होतील. जमिनींच्या डिजिटल नोंदी पुरविण्यासाठी १० राज्यांनी सहमती दिली.  ‘‘आता कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ होईल. भारतातील १ कोटी २० लाख शेतकऱ्यांसाठी कर्जासाठीचा वेळ तीन ते चार आठवड्यांवरून पाच मिनिटांपर्यंत कमी होईल.

Nabard
Crop Loan : धान पिकाला यंदा २३१०० रुपये पीककर्ज

कृषी कर्जाचे डिजिटायझेशन बँकांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करून, ग्रामीण समृद्धी वाढविण्याच्या नाबार्डच्या ध्येयाला पुढे नेईल,’’ असेही शाजी यांनी सांगितले.  
आरबीआय इनोव्हेशन हबचे सीईओ बन्सल म्हणाले, ‘‘ही भागीदारी केवळ तंत्रज्ञानाच्या एकात्मतेबद्दल नाही, तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेची पुनर्कल्पना करण्यासाठी आहे. एक अब्ज भारतीयांसाठी सहज वित्तपुरवठा करण्यासाठी नावीन्यपूर्णतेचा वापर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये अंमलबजावणी
भागीदारीच्या पहिल्या टप्प्यात कर्नाटक ग्रामीण बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि आंध्र प्रदेशमधील सहकारी बँकांसह निवडक ग्रामीण बँकांमध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांमधून सुमारे पाच कोटींची डिजिटल कृषिकर्जे देण्याचा ‘नाबार्ड’चा मानस आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com