HTBT Cotton Seed : कपाशीचे एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी जिंतूर तालुक्यात गुन्हा

Illegal Seed Sale : संबंधित बियाणे पाकिटांवर कंपनीचे नाव, उत्पादन तारीख, चाचणी तारीख, वैधता कालावधी यांसारख्या कोणत्याही अधिकृत माहितीचा उल्लेख नसल्याचे आढळून आले.
HTBT Seeds
HTBT SeedsAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यातील भांबरी (ता. जिंतूर) येथे विनापरवाना व संशयीतपध्दतीने कपाशीच्या एच.टी.बी.टी. बियाणे विक्री प्रकरणी मारोतीराव बापूराव भोंबे या विक्रेत्या विरुद्ध चारठाणा (ता. जिंतूर) कृषी विभागाकडून पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

भांबरी (ता. जिंतूर) येथे विनापरवाना आणि संशयित पद्धतीने कापसाच्या एच.टी.बी.टी.बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, विभागीय कृषी सहसंचालक (लातूर) साहेबराव दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक समाले, कृषी अधिकारी शिवाजी वावधने, विस्तार अधिकारी के. डी. सरकटे यांच्या पथकाने पोलिस आणि पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.

HTBT Seeds
HTBT Seeds: अनधिकृत कापूस बियाण्यांनी व्यापला ५० टक्‍के बाजार

त्यावेळी मारोतीराव भोंबे याच्या घरी वरद सीएच १०१ नावाचे संशयित बियाण्याची ३ हजार ६०४ रुपये किमतीची ४ पाकिटे आढळून आली. संबंधित बियाणे पाकिटांवर कंपनीचे नाव, उत्पादन तारीख, चाचणी तारीख, वैधता कालावधी यांसारख्या कोणत्याही अधिकृत माहितीचा उल्लेख नसल्याचे आढळून आले.

HTBT Seeds
HTBT Seeds: अप्रमाणित बियाण्यांची मेमध्येच ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

हे बियाणे अनधिकृत व संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले. घरातील झडती दरम्यान चौकशीअंती भोंबे यांनी ते नारायण वैद्य (रा. वडगाव, ता. मंठा, जि. जालना) यांच्याकडून विक्रीसाठी मिळाले असल्याचे सांगितले. मात्र, कारवाई दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.

या प्रकरणी बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कलमानुसार चारठाणा पोलिस ठाण्यात एफ.आय.आर.दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अधिकृत व मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडूनच बियाणे आणि खते खरेदी करावीत. कुठेही विनापरवाना, अनधिकृत बियाणे व खते विक्री होत असल्यास त्याची तत्काळ कृषी विभागास माहिती द्यावी, शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणेच खरेदी करावे, असे आवाहन दीपक सामाले यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com