Soybean Farmers : बारदाना टंचाईमुळे शेतकऱ्यांची कोंडी; सोयाबीन विक्रीत अडथळा

Soybean Procurement : नाफेडद्वारा खरेदी होत असलेल्या केंद्रावर बारदाना नसल्याच्या कारणाने सोयाबीनची खरेदी थांबलेली आहे.
Soybean Bardana Bag
Soybean ProcurementAgrowon
Published on
Updated on

Akola News : नाफेडद्वारा खरेदी होत असलेल्या केंद्रावर बारदाना नसल्याच्या कारणाने सोयाबीनची खरेदी थांबलेली आहे. हजारो शेतकऱ्यांची सोयाबीन अद्याप खरेदी व्हायची शिल्लक असून केंद्रांवर शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मनस्ताप तर सहन करावा लागतोच आहे, शिवाय वाहन भाड्याचा भुर्दंडसुद्धा झेलावा लागत आहे.

खुल्या बाजारात सोयाबीनचा दर घसरल्याने शेतकरी शासकीय खरेदीवर अवलंबून राहत आहेत. यासाठी नोंदणी केलेली असून २५ टक्के शेतकऱ्यांची मोजणी झालेली आहे.

Soybean Bardana Bag
Soybean Procurement Delay : सोयाबीन खरेदी अडकली बारदाना दरातील तफावतीत

गेल्या आठ-दहा दिवसांपासून बारदाना नसल्याने असंख्य केंद्रांवरील कामकाज ठप्प पडलेले आहे. जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काही केंद्रांना थोडा बारदाना दिल्या गेला.

मात्र, दोनच दिवसांत हा बारदाना संपला. आता काही केंद्रे ३१ डिसेंबरपासून बंद आहेत. काही मोजक्या केंद्रांना बारदाना मिळत असून तेथे कामकाज सुरू आहे.

Soybean Bardana Bag
Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला ३१ पर्यंत मुदतवाढ द्या
शेतकऱ्यांचे सोयाबीन किमान आधारभूत किमतीने खरेदी करणे खूप आवश्‍यक आहे. सोयाबीन किंचित प्रमाणात डिस्कलर झाला असल्याने ही संधी साधून जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर दोनशे ते अडीचशे रुपये प्रति क्विंटलने अवैध वसुली चालू आहे. अकोला जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. आपण या मुद्द्यावर आक्रमक घेत आंदोलन करणार आहोत.
- गोपाल पोहरे, शेतकरी पुत्र, उरळ बुद्रुक, जि. अकोला
जेव्हा शासन हमीभावात शेतकऱ्याचा माल खरेदी करण्याची घोषणा करते त्यावेळी शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रावर मानसिक त्रास सहन करावा लागतो. गेल्या काही वर्षात बारदाना नाही या सबबीखाली महिना-महिना खरेदी केंद्रे बंद ठेवली जातात. बाजारात नवा बारदाना उपलब्ध आहे. मग, शेतकरी नवीन बारदान्याला माल चाळणी करून आणून देऊ शकतात. पण काहीही कारण सांगून फक्त माल खरेदी करायचा नाही, हे धोरण शासनाचे दिसून येत आहे. आतापर्यंत फक्त ३० टक्के माल खरेदी केला आहे. बाकी शेतकऱ्यांनी काय करायचे. खरेदी केंद्रावर सुधारणा होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा माल मोजून घ्यायला हवा. बारदाना आल्यावर पोते भरता येऊ शकतात. शासनाला खरोखर खरेदी करायचे असेल तर मार्ग निघू शकतात. पण ती मानसिकताच दिसत नाही.
- रमेश निकस, जानेफळ, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com